नवी दिल्ली : पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल दिनी निवडलेल्या मुलांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. पण या पुरस्काराचे नाव बदलून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार करण्यात आले आहे. 61 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आईसीसीडब्ल्यूने निवडलेल्या धाडसी विद्यार्थी परेडमध्ये सहभागी होतात. पण याऐवजी महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालयाने निवडलेल्या मुलांचे पुरस्कार घोषित होतील. बाल वीरता पुरस्कारासाठी देशभरातून निवडलेल्या 21 धाडसी मुले प्रजासत्ताक दिनी राजपथावर उपस्थित नसतील. 1957 नंतर असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुलांना निवडणाऱ्या इंडियन काऊंसिल फॉर चिल्ड्रन वेल्फेयर (आईसीसीडब्ल्यू) वर आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे.
सर्व धाडसी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्ती पत्रक आणि मेडल दिले जाते. पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च देखील परिषद करते. भारत पुरस्कारासाठी 50 हजार, संजय चोप्रा पुरस्कारासाठी 40-40 हजार रुपये, बापू गायधनी पुरस्कारासाठी 25 हजार रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी 20-20 हजार रुपये दिले जातात.
आईना दीक्षित (उत्तर प्रदेश) मोहम्मद सुहैल, अरुणिमा सेन, एयू नचिकेता कुमार (कर्नाटक), अश्वथ सूर्यनारायण(तमिलनाडु), नैसर्गिग लैंका (ओडिशा), माधव लवकारे (दिल्ली) आर्यमान लखोटिया (प. बंगाल), प्रत्यक्ष बीआर (कर्नाटक),आयुष्मान त्रिपाठी (ओडिशा), मेघा (राजस्थान), निशांत धनखड़ (दिल्ली) राम एम. (तमिलनाडु), देवदुष्यंत जोशी(गुजरात), विनायक एम. (कर्नाटक), आर्यमान अग्रवाल (प. बंगाल), टी अतुल पांड्या (महाराष्ट्र),शिवांगी, अनीश (हरियाणा), आर. प्रागनंद्धा (तमिलनाडु), एशो (अंडमान), प्रियम टी. (आंध्रप्रदेश), ए. देवकुले (महाराष्ट्र)
कार्तिक गोयल, तिची बहिण आद्रिका गोयल (मध्यप्रदेश) या दोन मुलांनी 2 एप्रिल 2018 ला कठीण परिस्थीती उद्भवली असताना घरातून जेवण नेऊन रेल्वे प्रवाशांना वाटले होते. मुरैना रेल्वे स्थानकावरील मुलांनी हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.