नवी दिल्ली : इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि कोट्याधीश नंदन निलकेणी आणि त्यांची पत्नी रोहिणी निलकेणी हे आपली संपत्ती दान केली आहे. त्यांच्या या निर्णयाचेही एक खास वैशिष्ट्य आहे. कारण, त्यानी द गिव्हिंग प्लेज मोहिमेशी जोडून घेतले आहे.
द गिव्हिंग प्लेजच्या वेबसाईटवर निलकेणी यांनी आपल्या हस्ताक्षरातीले एक पत्र अपलोड केले आहे. या पत्रात त्यांनी बिल गेट्स आणि मेलिंड यांना सांगितले की, आम्हाला भग्वद गितेतून मिळालेल्या प्रेरणेतील अनुभूती दिल्याबद्धल धन्यवाद. या पत्रात निलकेणी यांनी गितेतील एक श्लोक 'कर्मण्यं वाधिकारस्ते मां फलेशू कदांचन'चा उल्लेख केला आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे की, आम्हाला फळाची चिंता न करता आपले काम करता आले पाहिजे. निलकेणी यांनी हे पत्र बिल गेट्स यांच्या ट्विटर हॅंडलवरही ट्विट केले आहे. दरम्यान, बिल गेट्स यांनीही ट्विट केले आहे. मला आश्चर्य वाटते की, औद्योगिक क्षेत्रातू पूढे येत निलकेणी यांनी परोपकाराचा मार्ग स्विकारण्यासाठी पुढे आले आहेत. मला अत्यंत आनंद होत आहे. मी निलकेणी आणि त्यांच्या पत्नीचेही आभार मानतो.
I’m amazed by how @NandanNilekani has lent his entrepreneurial passion to philanthropy. I’m delighted to welcome him and his wife Rohini to the Giving Pledge. pic.twitter.com/cvf9JHmb37
— Bill Gates (@BillGates) November 20, 2017
गव्हिंग प्लेज या मोहिमेची सुरूवात बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स आणि वॉरन बफेट यांनी ऑगस्ट 2010मध्ये केली होती. नंदन निलकेणी हे चौथे भारतीय आहेत. ज्यांनी या मोहिमेशी जोडून घेतले आहे. यापूर्वी विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी, बायकॉनचे चेअरमन किरन मुजूमदार आणि शोभा डेव्हलपरचे चेअरमन पीएनसी मेनन यांनी या मोहिमेशी जोडून घेतले आहे.