मुस्लिम सत्यशोधक मंडळ पंतप्रधानांच्या भेटीला

 मुस्लिम सत्यशोधक मंडळाने तिहेरी तलाक संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Updated: Dec 19, 2017, 11:16 PM IST
मुस्लिम सत्यशोधक मंडळ पंतप्रधानांच्या भेटीला  title=

नवी दिल्ली : मुस्लिम सत्यशोधक मंडळाने तिहेरी तलाक संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तिहेरी तलाक कायद्यात काही तरतूदी सत्यशोधक मुस्लिम मंडळाने सुचवल्या आहेत.

देशामध्ये एकच विवाह कायदा असावा. हलालासाठी शिक्षेची तरतूद करावी. तसंच तलाक-ए-बिद्दत या तलाक देण्याच्या पद्धती गुन्हा ठरवाव्यात. पुरुषासमोर दुसरे लग्न करण्याचा मार्ग मोकळा असतो तो रोखावा. बहुपत्नीत्व विरोधाची तरतुद करावी आणि पुरोगामी मुस्लिम संघटना, व्यक्ती, तज्ज्ञांचा आराखडा समितीत समावेश करावा, अशा मागण्या मुस्लिम सत्यशोधक मंडळानं मोदींकडे केल्या आहेत.