खुल्यावर शौचाला बसलेल्यांना गुरांच्या गाडीतून शहराबाहेर सोडले

 अधिकाऱ्यांनी आतापर्यंत शहरात उघड्यावर बसलेल्या २८ जणांना गाडीत बसवून शहराबाहेर काढले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 17, 2017, 04:18 PM IST
खुल्यावर शौचाला बसलेल्यांना गुरांच्या गाडीतून शहराबाहेर सोडले  title=

बिलासपूर : उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना आळा घालण्यासाठी छत्तीसगढ प्रांतातील बिलासपुरमध्ये विचित्र पद्धती वापरल्या जात आहेत. जे लोक उघड्यावर शौचास बसत आहेत त्यांना प्राण्यांच्या व्हॅनमध्ये जबरदस्ती बसवून शहरापासून बाहेर ९ कि.मी. दूर अंतरावर सोडले जाते. 

स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत, हा कार्यक्रम बिलासपूर महानगरपालिका अधिकार्यांनी हाती घेतला आहे. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत शहरात उघड्यावर बसलेल्या २८ जणांना गाडीत बसवून शहराबाहेर काढले आहे. 

त्याचप्रमाणे अधिकार्यांनी इतर २४  नागरिकांवर आर्थिक दंड लावला. त्यापैकी तीन महिलांना आर्थिक दंड न भरता आल्याने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्राण्यांच्या गाडीत जबरदस्ती भरणे हा अमानवी प्रकार असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. "लोकांना अशाप्रकारची शिक्षा देऊन अपमानित करण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जागरूकता करण्याची गरज आहे" असे  सामाजिक कार्यकर्त्या ममता शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. 
दरम्यान खुल्यावर शौचास बसलेल्यांना गुरांच्या गाड्यांतून शहराबाहेर काढणाच्या शिक्षा झाली नसल्याचे  बिलासपूर महानगरपालिकेचे आयुक्त मिथिलेश अवस्थी सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.  छत्तीसगढचे बिलासपूर क्षेत्र स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात खालच्या स्तरावर आहे. गेल्यावर्षी स्वच्छतेच्या मोहिमेबद्दल प्रसिद्ध झालेल्या यादीत बिलासपूरचे नाव १७९ वा आहे