मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महागाईने कळस गाठले आहे. भारतात नोकरदार वर्गाची संख्या सर्वात मोठी आहे. नोकरी करण्याऱ्यांच्या मनात सतत अपेक्षा असते ती म्हणजे पगार वाढण्याची. पण वर्षाचे 365 दिवस काम करूनही फक्त एकदाच पगारात वाढ होते. पण भारतात एक असे शहर आहे, जिथे पगार वाढ मोठ्या प्रमाणात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात पगार वाढ जास्त प्रमाणात होते. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. 2014-18 दरम्यान मुंबईतील स्थानिक उत्पन्न वाढीचा दर जास्त आहे. जगातील 32 शहरांमध्ये मुंबई तीसऱ्या क्रमांकावर आहे. नाईट फ्रँकच्या अर्बन फ्यूचर्सच्या जागतिक अहवालतून ही माहिती समोर आली आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, उत्पन्नाच्या वेगवान वाढीमुळे पाच वर्षांत घरांच्या किमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. घरांच्या किमतींमध्ये किंचित वाढ झाल्यामुळे मुंबई इतर शहरांशिवाय जगभरातील सर्वात स्वस्त शहर बनले आहे, तरीही भारतातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये हे सर्वात महागडे शहर आहे.
तुलनात्मकदृष्ट्या घरांच्या किंमतांमध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण मागील पाच वर्षांमध्ये घरांच्या किमतीत सतत 20.4 टक्क्यांनी वाढ होत आहे. या सर्वेक्षणात घरांच्या किमती आणि त्या व्यक्तीची आवक यांच्यातील अंतर समजून घेण्यासाठी, जगभरातील ३२ शहरांचे मुल्यांकन करण्यात आले आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या उत्पन्न वाढीचा दर 25% पर्यंत पोहोचला आहे, तर अॅमस्टरडॅम मध्ये घरांच्या किमतीत 63.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.