कपडे धुतल्यानंतर खाली राहिलेल्या Detergent पावडरचा 'असा' करा घरगुती उपयोग

उरलेल्या सोल्युशनमध्ये काही गोष्टी मिसळून तुम्ही हे सोल्युशन अनेक गोष्टींसाठी वापरू शकता.

Updated: Aug 27, 2022, 11:08 PM IST
कपडे धुतल्यानंतर खाली राहिलेल्या Detergent पावडरचा 'असा' करा घरगुती उपयोग title=

Multiple Use of Detergent Powder: अनेकदा आपण डिटर्जंट पावडर ( Detergent) विरघळवून कपडे स्वच्छ करतो. कपडे धुतल्यानंतर खाली डिटर्जंट पावडर राहते ज्यामध्ये भरपूर फेस देखील असतो.

या उरलेल्या घाणेरड्या सोल्युशनचा (Solution) काही उपयोग नसतो आणि तो फेकून द्यावा लागतो. पण या उरलेल्या सोल्युशनमध्ये काही गोष्टी मिसळून तुम्ही हे सोल्युशन अनेक गोष्टींसाठी वापरू शकता. त्यामुळे तुमचा सर्फ (Surf) वाया जाण्यापासून वाचेल आणि इतर गोष्टी करून पैसेही वाचतील.

- उरलेल्या सर्फॅक्टंटमध्ये बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस घालून कीटकनाशक सोल्यूशन तयार करता येते. बाथरूममध्ये तसेच तुमच्या घरापासून असे कीटक दूर राहण्यास मदत होईल.

- डिटर्जंट सोल्युशनमध्ये थोडासा लिंबाचा रस घालून स्वयंपाकघरातील सिंक (Sink) आणि वॉश बेसिन साफ ​​करता येते. हे सोल्यूशन वॉश बेसिनमध्ये टाकून ब्रशने नीट साफ केल्याने वॉश बेसिन चमकदार होण्यास मदत होईल.

- घरात जर सर्वात अस्वच्छ जागा असेल तर ती म्हणजे डोअरमॅट. इथे प्रत्येकजण येऊन पाय आणि जोडे पुसतो. कपडे धुतल्यानंतर उरलेले डिटर्जंट सोल्यूशन डोअरमॅटवर ठेवा आणि थोडावेळ वितळू द्या आणि काही वेळाने घासून घाण काढून टाका.

- फरशी साफ करण्यासाठी विविध प्रकारचे क्लीनर येत आहेत परंतु आपण डिटर्जंट सोल्युशनमध्ये थोडेसे क्लिनर टाकून घरातील फरशी स्वच्छ करू शकतो.

- टॉयलेट सीट अतिशय गलिच्छ असेल तर उरलेल्या डिटर्जंट सोल्युशनमध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. हे टॉयलेट सीटवर ठेवून ब्रशने नीट साफ केल्यास ते चमकेल. 

- बाथरूमच्या टाइल्सवर पाण्याचे डाग दिसतात. टाइल्स साफ करण्यासाठी आम्ही क्लिनर वापरतो. डिटर्जंटमध्ये सोडा किंवा व्हिनेगर घालून बाथरूमच्या टाइल्स साफ करता येतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)