मुकुल रॉय यांचा राजीनामा, ममता बॅनर्जींना मोठा झटका

तृणमूल काँग्रेसचे खासदार मुकुल रॉय यांनी सोमवारी जाहीर केलं आहे की, ते दुर्गा पूजानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे. मुकुल रॉय सोबतच पक्षाचा देखील राजीनामा देणार आहे. त्यांनी पक्षाच्या वर्किंग कमेटीतूनही राजीनामा दिला आहे.

Updated: Sep 25, 2017, 12:50 PM IST
मुकुल रॉय यांचा राजीनामा, ममता बॅनर्जींना मोठा झटका title=

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार मुकुल रॉय यांनी सोमवारी जाहीर केलं आहे की, ते दुर्गा पूजानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे. मुकुल रॉय सोबतच पक्षाचा देखील राजीनामा देणार आहे. त्यांनी पक्षाच्या वर्किंग कमेटीतूनही राजीनामा दिला आहे.

मुकुल रॉय यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २०१८ मध्ये संपणार आहे. मुकुल रॉय हे टीएमसीचे मोठे नेते आहेत. त्यांचा पक्षातून राजीनामा हा पक्षासाठी आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा झटका आहे. मुकुल रॉय यांनी म्हटलं की, दुर्गा पूजेनंतरच ते खुलासा करतील की त्यांनी पक्षाचा राजीनामा का दिला.