Mukesh Ambani यांनी घेतलं कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठं Syndicate Loan, जाणून घ्या काय आहे प्लान

Reliance Industries: मुकेश अंबानी यांनी सर्वात मोठं (Greatest Loan) लोन घेतलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि जिओ टेलिकॉम (Jio Telecom) या दोन कंपन्यांनी यावेळी मोठी रक्कम उभारली आहे. 55 बॅंकांकडून त्यांनी 3 अब्ज डॉलरचं (3 Billion Dollar) उलाढाल केली आहे. 

Updated: Apr 6, 2023, 05:19 PM IST
Mukesh Ambani यांनी घेतलं कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठं Syndicate Loan, जाणून घ्या काय आहे प्लान  title=
Indian Business Magnet Mukesh ambani raised total of 5 billion usd foreign currency loans reporting indias higest syndicate loan in the corporate industry

Mukesh Ambani Reliance JIO Loan:  मुकेश अंबानी आपल्या बिझनेसचा (Mukesh Ambani Syndicate Loan) अनेकदा विस्तार करताना दिसतात. आत्ताच समोर आलेल्या बातमीनुसार मुकेश अंबानी यांनी भारतातील सर्वात मोठं सिडिंकेट लोन (Mukesh Ambani News) घेतलं आहे. ज्यातून अंबानी मोठ्या प्रमाणावर फंड उभारणार आहेत.

हे सिंडिकेट लोन आत्तापर्यंतच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिंकेट लोन आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं विदेशी मुद्रा ऋण(Foreign Currency Loans) म्हणजे फॉरेन करन्सी लोन्सद्वारे वेगवेगळ्या बॅंकांकडून 5 अब्ज डॉलर्स एवढे पैसे जमवले आहेत. बॅंका आणि वित्तिय संस्थांच्या आधारे सिंडिकेट (Bank Syndicate Loans) लोन घेतले जाते. (Mukesh ambani raised total of 5 billion usd foreign currency loans reporting indias higest syndicate loan in the corporate industry)

काय आहे प्लॅन? 

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ इन्फोकॉम या दोन कंपन्यांनी याद्वारे एकूण 5 बिलियम यूएसडी इतकं रक्कम उभारली आहे. मागील वर्षी रिलायन्सनं 3 बिलियन म्हणजे 3 अब्ज डॉलर्सची रक्कम ही 55 बॅंकांकडून उभारली होती. त्याचसोबत जिओ इन्फोकॉमनं 18 बॅंकांकडून 2 अब्ज डॉलरचं अतिरिक्त क्रिडिट घेतलं आहे. 

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ टेलिकॉमनं या लोनमधून मोठी रक्कम जोडली आहे. रिलायन्स इन्फोकॉमनं 18 बॅंकांकडून 2 अब्ज डॉलरचे अतिरिक्त कर्ज घेतले आहे. तर 31 मार्च पर्यंत त्यांनी 3 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते तर 2 अब्ज डॉलर हे येत्या मंगळवारी जोडले आहेत. 

हेही वाचा - रामायण मालिकेसाठी दारा सिंग यांनी केला होता 'त्या' गोष्टीचा त्याग..

कुठल्या बॅंकाचा आहे समावेश? 

रिलायन्स जिओनं तर्फे लवकरच 5G नेटवर्क (5G Network) सुरू होणार आहे. त्यासाठी मोठा पैसा लागणार आहे. तेव्हा 55 बॅंकांकडून अंबानींच्या कंपन्यांनी 3 अब्ज डॉलरचं लोन घेतलं आहे. यामध्ये ताईवानच्या बॅंकासोबतच, बॅंक ऑफ अमेरिका, एचएसबीसी, एमयूएफजी, सिटी, एसएमबीसी, मिझुहो आणि अन्य काही आंतरराष्ट्रीय बॅंकांची नावं आहेत. 

मुकेश अंबानी यांनी घेतलेल्या या लोननंतर सध्या सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. यामध्ये अतिरिक्त कर्ज आणि 55 बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. याआधीही त्यांनी असेच लोन घेतले होते. त्याचीही खूप चर्चा झाली आहे. येत्या काळात यातून मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.