धोनी बनला झारखंडचा सर्वात मोठा करदाता!

६०५ नागरिकांनी एक करोड किंवा त्याहून अधिक रुपये जमा केलेत 

Updated: Jul 24, 2018, 12:52 PM IST
धोनी बनला झारखंडचा सर्वात मोठा करदाता! title=

रांची : क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी झारखंडमध्ये व्यक्तीगत श्रेणीत सर्वात मोठा करदाता म्हणून समोर आलाय. धोनीनं २०१७-१८ साठी त्यानं १२.१७ करोड रुपयांचा रिटर्न दाखल केलाय. २०१६-१७ मध्ये त्यानं तब्बल १०.९३ करोड रुपयांचा रिटर्न दाखल केला होता. सध्याच्या आर्थिक वर्षात त्यानं आत्तापर्यंत 'अॅडव्हान्स्ड टॅक्स'च्या रुपात तीन करोड रुपये जमा केलेत. मुख्य आयकर आयुक्त व्ही. महालिंगम यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेऊन त्यात ही माहिती दिलीय. 

राज्यात नोटाबंदीनंतर दहा लाख रुपयांहून अधिक रक्कम ३५०० नागरिकांकडून बँकेत जमा करण्यात आलीय. यातील ६०५ नागरिकांनी एक करोड किंवा त्याहून अधिक रुपये जमा केलेत, अशीही माहिती आयुक्तांनी दिलीय. 

राज्यात ६७७ शेक कंपन्या कार्यरत असल्याची माहितीही आयुक्त महालिंग यांनी दिलीय. याशिवाय, २७१ नागरिकांनी पाच लाख रुपयांहून अधिक कृषी उत्पन्न दाखवलंय. केवळ झारखंडमधून २२१७ करोड रुपयांची आयकर मिळालाय. 

३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न दाखल करण्यास असमर्थ ठरलेल्या नागरिकांना पाच हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरनंतर हा दंड दहा हजार असेल.... पाच लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड लावण्यात येईल.