भाजप खासदार जया प्रदांची 'शाळा', देशाचे चुकवले स्पेलिंग

जया प्रदा यांनी ‘स्कूल चलो अभियाना’अंतर्गत विद्यार्थ्यांचे धडे दिले आणि स्वत:च चूक केली.

Updated: Jul 7, 2019, 12:18 PM IST
भाजप खासदार जया प्रदांची 'शाळा', देशाचे चुकवले स्पेलिंग  title=

लखनऊ : भाजप खासदार जया प्रदा यांनी ‘स्कूल चलो अभियाना’अंतर्गत विद्यार्थ्यांचे धडे घेण्यास सुरुवात केली. मात्र, देशाचे स्पेलिंग लिहितांना त्यांचीच 'शाळा' झाली. स्पेलिंग चुकल्याने जया प्रदा यांची विद्यार्थांसमोर चांगलीच फजिती झाल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत आहे.

भाजप नेता जया प्रदा या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्वतःच चुकीचे स्पेलिंग लिहिले. त्यांना country चे स्पेलिंग लिहिता आले नाही. त्यांनी आणि country ऐवजी contry असे लिहिले आणि तिथेच घोळ झाला. मोठ्या उत्साहात मुलांना इंग्रजीची धडे देताना स्वत:च चूक केली आणि ही चूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

‘स्कूल चलो अभियाना’अंतर्गत जया प्रदा या हजरतनगर सैदपूर येथील एका शाळेत गेल्या होत्या. त्यांनी आधी विद्यार्थ्यांची हिंदीत शिकवणी घेतली. त्यानंतर तुम्हाला इंग्रजी येते का, असे विचारत इंग्रजी शब्द लिहिण्यासाठी फळ्याकडे गेल्यात. फळ्यावर काही फळांची नावे इंग्रजीत लिहिली. आणि अखेरीस त्यांनी ‘भारत माझा देश आहे’ हे वाक्य इंग्रजीत लिहिले. त्यांनी देशाचे 'country' ऐवजी 'contry' लिहिले. चूक समजली मात्र, वेळ निघून गेला. या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.