मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणीला फरफटत नेले, धक्कादायक CCTV फूटेज समोर

Mobile Snatched: टक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अल्पवयीन असून दुसऱ्याचे नाव भोला असल्याचे सांगण्यात येत आहे. छंद जोपासण्यासाठी दोघांनी मोबाईल चोरी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 3, 2023, 04:45 PM IST
मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणीला फरफटत नेले, धक्कादायक CCTV फूटेज समोर title=

MP Crime: चैन, मोबाईल स्नॅचिंगचा एका धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मोबाईल चोरण्याच्या नादात बाईकवरच्या चोरट्यांनी तरुणीला फरफटत नेल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील ट्रेडर आयलॅंड मॉलसमोर हा प्रकार समोर आला आहे. 

सध्या सोशल मीडियामध्ये एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. एक तरुणी रस्त्यातच्या कडेने मोबाईलवरुन बोलत चालली आहे. ती मोबाईलवर बोलण्यात गुंग असून अगदीच बेसावध आहे. दरम्यान बाईकवरुन येणाऱ्या दोन तरुणांनी हे हेरलं असून तिच्या दिशेने जाऊ लागले. मुलगी रस्त्याच्या डाव्या बाजुने चालली होती. तिच्या डाव्या हातात मोबाईल होता. दरम्यान बाईकवरुन मागून आलेले चोरटे तिच्या डाव्याबाजूला गेले. त्यांनी तिच्या हातातून मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. चोरांने मोबाईल घट्ट पकडून ठेवला होता.  दरम्यान तरुणीने हातातला मोबाईल न सोडल्याने तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.  या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना इंदूरमधील ट्रेजर आयलँड मॉलसमोर दुपारी 12 वाजता घडली. एक 20 वर्षीय तरुणी मोबाईलवर बोलत घरी चालली होती. यादरम्यान पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. तरुणीने मोबाईल सोडला नाही तेव्हा नराधमांनी तिला काही अंतर ओढत नेले. काही वेळातच त्यांनी मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मोबाईल खेचण्यापासून वाचवताना तरुणी चुकून डोक्यावर पडली असती तर अनर्थ घडण्याची शक्यता होती, याचा अंदाज व्हिडिओ पाहूनच लावता येतो. मात्र, या घटनेत मुलीला गंभीर दुखापत झाली नसून, तिच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.

पोलिसांकडून चोरांना अटक

घटनेची माहिती मिळताच तुकोगंज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. 20 वर्षीय प्रियांशी ही वल्लभनगर येथे वडील दीपक दुबे यांच्य घरी चालली होती. यावेळी ही घटना घडल्याचे स्टेशन प्रभारी कमलेश शर्मा यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अल्पवयीन असून दुसऱ्याचे नाव भोला असल्याचे सांगण्यात येत आहे. छंद जोपासण्यासाठी दोघांनी मोबाईल चोरी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.