भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अलिराजपूर जिल्ह्यातील एका गावी, एक 20 वर्षीय विवाहिता तिच्या सासरच्यांना न सांगता तिच्या मामाच्या घरी जायला गेली. त्यावेळी या विवाहितेला तिच्या माहेरच्या लोकांनी तिला झाडाला बांधून काठीड्या दांड्याने निर्दयपणे मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral) झाला आहे. व्हिडिओ पाहा ( 20-year-old married girl brutally beaten up by hanging from a tree)
पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात पीडित महिलेच्या चार भावांना शुक्रवारी आयपीसीच्या कलम 151 अन्वये अटक करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता तेथून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अलिराजपूर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय भागवानी यांनी शुक्रवारी सांगितले की, अलिराजपूर जिल्हा मुख्यालयापासून50 किमी अंतरावर बोरी पोलिस ठाण्याच्या बडे फुटतालाब गावात एक विवाहितासोबत (20) 28 जून रोजी संध्याकाळी ही घटना घडली.
एसपीने सांगितले की, या महिलेचे अलीकडेच भुरछेवडी गावातील मुलाशी लग्न झाले होते आणि तिचा नवरा गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करायला गेला असता तिला एकटीला सोडून गेला. त्यामुळे ती नाराज झाली. तिने सासरच्यांना कुणालाही न सांगता मामाच्या घरी गेली.
पोलीस अधीक्षक भागवानी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुलगी सासरी न सांगता मामाकडे गेली. याचा राग आल्यावर तिच्या आई-वडिलांनी त्याला घरी आणले आणि नंतर बेदम मारहाण केली. यादरम्यान एकाने या घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. ते म्हणाले की या प्रकरणात 1 जुलै रोजी रात्री बोरी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तिचे भाऊ केलसिंह निनामा, कारम निनामा, दिनेश निनामा आणि उदय निनामा यांच्यावर आयपीसी कलम 355, 323, 294 आणि 506 अन्वये आरोपी म्हणून कारवाई करण्यात आली आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.