Movie Offer | स्वस्तात चित्रपट पाहण्याची संधी; येथे मिळतोय 50 टक्के डिस्काउंट

कोरोना संसर्गामुळे दीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या  थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद लुटन्याची अनेकांनी इच्छा असते.

Updated: Nov 15, 2021, 08:41 AM IST
Movie Offer | स्वस्तात चित्रपट पाहण्याची संधी; येथे मिळतोय 50 टक्के डिस्काउंट  title=

मुंबई : कोरोना संसर्गामुळे दीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या  थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद लुटन्याची अनेकांनी इच्छा असते. कुटूंब आणि मित्रांच्या सोबत स्वस्तात चित्रपट पाहण्याची हौस पूर्ण करण्यासाठी संधी निर्माण झाली आहे. चित्रपट थिएटर सुरू झाल्याने सिनेमा हॉल, बँक, बुकिंग ऍप, आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे ऑफर्स देत आहेत.

कोरोना संसर्गानंतर देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे. अशातच चित्रपट थिएटर देखील सुरू होत आहेत. त्यामुळे काही बँका आपल्या ग्राहकांना चित्रपट टिकिटांवर ऑफर्स देत आहेत.

देशातील 7 वी मोठी बँक असेलेल्या इंडियन बँकने आपल्या ग्राहकांसाठी चित्रपटाच्या टिकिट खरेदीवर 50 टक्क्यांची भरघोस सूट दिली आहे. 

तुम्ही इंडियन बँकेचे ग्राहक असाल तर, क्रेडिट कार्डने टिकिट बुक करण्यावर 50 टक्क्यांचा बंपर डिस्काउंट मिळणार आहे.  जाणून घेऊ या त्यासंबधीचे नियम

ऑफरचा लाभ घेण्याच्या अटी

  • तुमच्याकडे Indian Bank चे Rupay क्रेडिट कार्ड असायला हवे
  • Book My Show या संकेतस्थळावरून चित्रपटाचे टिकिट जारी करावे लागेल
  • एका वेळी जास्तीत जास्त 250 रुपयांचा डिस्काउंट मिळेल
  • ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत सुरू असणार आहे