ललनांसोबत राजकीय नेत्याचे बारमध्ये ठुमके; मगच मतदान (व्हिडिओ)

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील पताही प्रखंड पंचायत समितीशी संबंधीत आहे. 

Updated: Aug 27, 2018, 01:47 PM IST
ललनांसोबत राजकीय नेत्याचे बारमध्ये ठुमके; मगच मतदान (व्हिडिओ) title=

नवी दिल्ली: घटना आहे बिहारमधील. आरोप आहे की, येथील एका राजकीय नेत्याने मतदानाला जाण्यापूर्वी सहकाऱ्यांसोबत चक्क बारमध्ये बारबालांसोबत ठुमके लावले. या कथीत प्रकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मोतिहारी पंचायत समिती सदस्याचा असल्याचे बोलले जात आहे.

दारूचे घुटके आणि नशीले ठुमके

प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, हा व्हडिओ नेपाळमधील एका बार स्वरूपात असलेल्या हॉटेलमधला आहे. या हॉटेलमध्ये हा नेता ललनांसोबत दारूचे घुटके घेत ठूमके लावाताना दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील पताही प्रखंड पंचायत समितीशी संबंधीत आहे. पताही प्रखंडमध्ये सभापती पदासाठी निवडणूक पार पडणार होती. या निवडणुकीतल विजयाचे एक महत्त्वाचे दावेदार बलदेव पासवान या व्हिडिओत दिसत आहेत. 

व्हिडिओ व्हायरल झाला अन...

असेही बोलले जात आहे की, ज्या हॉटेलमध्ये ललना ठुमके लावत आहेत. त्या कार्यक्रमाचे पासवान हे प्रमुख सूत्रधार आहेत. बहुमतासाठी ११ सदस्यांची मते मिळावीत आणि  निवडूण यावे यासाठी त्यांनी सर्व सदस्यांना नेपाळमध्ये एका हॉटेलवर ठेवले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात असेही म्हटले आहे की, हे सर्व लोक गेले तिन दिवस नेपाळमधील हॉटेलमध्ये आहेत. तसेच, दारू आणि ललनांसोबत नाचगाणे करत आहेत. सदस्यांच्या या प्रकाराचे व्हिडिओ चित्रिकरण झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियातून पुढे आला झाला आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.

११ विरूद्ध ९ 

दरम्यान, पताही प्रखंडच्या ११ पंचायत समिती सदस्यांनी पंचायत समिती सभापतींच्या विरोधात ६ ऑगस्टला अविश्वास प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर झालेल्या चर्चेवेळी सभापती अमीरी बैठा यांना सभापती पद गमवावे लागले. त्यामुळे २७ ऑगस्टला पुन्हा एकदा सभापतीपदासाठी मतदान पार पडणार होते. दरम्यान, हा व्हिडिओ पुढे आला. दरम्यान, पंचायत समितीमध्ये एकूण २० सदस्य आहेत. त्यातील ११ सदस्यांचा बलदेव पासवान यांना पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. तर, उर्वरीत ९ सदस्य हे माजी उपसभापती अमीरी बैठा यांचे समर्थक मानले जातात.