सासू पडली सूनेच्या प्रेमात! समलैंगिक संबंधांसाठी सासूचा दबाव, पतीने मित्राकडे पाठवलं अन् मग...

सासूने सूनेवर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. एवढंच नाही तर हुंड्यासाठी पतीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे मुलाच्या जन्मानंतर तो दुसऱ्याचा आहे असा आरोप केला. 

नेहा चौधरी | Updated: Jun 26, 2024, 02:42 PM IST
सासू पडली सूनेच्या प्रेमात! समलैंगिक संबंधांसाठी सासूचा दबाव, पतीने मित्राकडे पाठवलं अन् मग... title=
Mother in law fell in love with daughter in law Pressured by mother in law lesbian relations husband sent her to friend Crime News

आगरातून एक विचित्र घटना समोर आली असून त्यानंतर एकच खळबळ माजली आहे. सासूचं सुनेवर प्रेम जडलं. या प्रेमातून सासूने (Mother in law) बळजबरीने समलैंगिक संबंध (Homosexual relationship) ठेवल्याचा आरोप सूनेने (daughter in law ) केलाय. सासू सुनेचं नातं हे आई आणि मुलीसारखं असतं. अशात या घटनेने सून आणि सासूच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना अतिशय विचित्र आणि भयावह आहे. धक्कादायक म्हणजे पतीनेही हुंड्यासाठी शारीरिक शोषण केल्याचा आरोप सुनेनं केलाय.

आधी सासूने शारीरिक यातना दिल्या, समलैंगिक संबंध ठेवले. पतीला कळल्यानंतर त्याने आईचीच बाजू घेतली. तसेच पत्नीला मित्रांच्या हवाली केले. गेल्या काही वर्षांत तिनं भोगलेल्या नरकयातना तिने पोलिसांसमोर व्यक्त केल्या आहेत.

पोलिसांकडे अत्याचारविरोधात तक्रार करण्यास आली असताना या पीडित महिलेने आपल्यावरील अत्याचाराची आपबीती सांगितली. शाहगंज इथे राहणाऱ्या या महिलेनं पोलिसांना (Crime News) सांगितलं की, 7 डिसेंबर 2022 रोजी गाझीपूरच्या आलोक या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर सासरच्यांनी तिचे सर्व दागिने तिच्याकडून काढून घेतले. 

धक्कादायक बाब म्हणजे, सासूने बळजबरी तिच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवले. असं एकदा नव्हे, तर वारंवार घडलं. जेव्हा-जेव्हा विरोध केला तेव्हा ती सुनेच्या हातावर ब्लेडने जखमा करायची. तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला. पण, तिची मदत करणे सोडून उलट पती आणि नणंदने तिला बळजबरी सासूसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. केवळ दागिनेच नव्हे तर तिचे कपडे सुद्धा हिसकावून घेतले.

यानंतर तिच्या पतीने क्रूरतेची हद्द पार केली. पैशांसाठी आपल्याच पत्नीचा सौदा केला. आपल्या मित्रांसोबत बळजबरी शारीरिक संबंध ठेवायला लावले. हा संपूर्ण घटनाक्रम सुरू असताना ती गर्भवती राहिली आणि 7 नोव्हेंबर 2023 रोजी तिने मुलाला जन्म दिला.यावर हा माझा मुलगा नाही म्हणत पतीने तिचा तिरस्कार केला आणि बेदम मारहाणही केली. शेवटी तिने आपली व्यथा वडिलांना सांगितली. वडील जेव्हा तिच्या घरी बोलायला आले, तेव्हा वडिलांसमोरच तिला मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसेच पीडितेच्या तक्रारीवरुन पती, सासू, वहिणी, काका आणि दोन चुलत भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय.