मुंबई : भारतीय लग्नांमध्ये संगीत सोहळ्यात चांगलीच धम्माल पाहायला मिळते. प्रत्येक लग्न नृत्याशिवाय अपूर्ण आहे. विवाहसोहळ्यात, वधू -वराच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि नातेवाईक समारंभात एकत्र येतात आणि उत्सव साजरा करतात.
फक्त लोकांच्या नृत्यामुळे लग्नात धूम असते. अलीकडेच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये अशीच धम्माल दिसून येते. जिथे वराची आई लग्नाच्या मंचावर तिचा जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आई स्टेजवर वधू -वरांच्या समोर जबरदस्त डान्स करत आहे. वरमाला झाल्यानंतर वराची आई एका नातेवाईकासोबत नाचताना दिसते. महिलेचा डान्स पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. सर्व महिलांचे नृत्य पाहून नातेवाईक आणि मित्रांना आश्चर्य वाटते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि एका अकाऊंटवरुन तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 93 हजार लोकांनी पाहिला आहे, आणि त्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'माझी रॉकस्टार आई' असे लिहिले आहे.