नवी दिल्ली : देशांना क्रेडिट रेटींग देणारी अमेरिकीची संस्था मूडीजने(जागतिक पत मानांकन संस्था) भारताच्या क्रमवारीत बदल केला आहे. मूडीजने भारतात ‘बीएए२’ या क्रमांकावर आणलं गेलंय.
मूडीजकडून करण्यात आलेली ही सुधारणा भारतासाठी एक मोठं सकारात्मक पाऊल आहे. मूडीजने १३ वर्षात प्रथमच भारताच्या क्रेडीट रेटींगमध्ये सुधारणा केली आहे. याआधी २००४ मध्ये संस्थेने भारताच्या क्रेडीट रेटींगमध्ये सुधार करत ‘बीएए३’ केला होता. क्रेडीट रेटींग वाढल्याने शुक्रवारी शेअर बाजारांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालं.
२०१५ मध्ये या संस्थेने भारताची क्रेडीट रेटींग ‘स्थिर’ वरून वाढवून ‘सकारात्मक’ केली होती. एजन्सीकडून सांगण्यात आलं आहे की, आर्थिक सुधारणांच्या दिशेने भारतात वाढ झाल्याने भारताला क्रेडीट रेटींग वाढवून मिळाली आहे.
Moody's believes that the @narendramodi Government's reforms will improve business climate, enhance productivity, stimulate foreign and domestic investment, and ultimately foster strong and sustainable growth. @MoodysInvSvc
— PMO India (@PMOIndia) November 17, 2017
पंतप्रधान कार्यालयाने याबाबतच्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘मूडीजचं म्हणनं आहे की, नरेंद्र मोदी सरकारच्या सुधारणांमुळे भारतात उद्योगपूर्ण वातावरणात सुधार होईल, उत्पादकतेमध्ये वाढ होईल, परदेशी आणि घरगुती गुंतवणूकीला प्रोत्साहन मिळेल. याने विकासाला वाढ मिळेल.