Monsoon Update 2022 | मान्सून केरळात, राज्यात कधी?

मान्सूनबाबत अतिशय महत्त्वाची (Monsoon Update 2022) माहिती समोर आली आहे. 

Updated: May 30, 2022, 06:14 PM IST
Monsoon Update 2022 | मान्सून केरळात, राज्यात कधी? title=

मुंबई : मान्सूनबाबत अतिशय महत्त्वाची (Monsoon Update 2022) माहिती समोर आली आहे. अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. मान्सून यंदा वेळेआधीच केरळात दाखल झालाय, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर मान्सूनचा पुढचा प्रवासही वेळेत होणार आहे. तसेच राज्यात मान्सून 6 ते 10 जूनदरम्यान धडकणार असल्याचंही हवमाना खात्यानं म्हटलंय. (monsoon update 2022 rain comed in keral know when comes in maharashtra see)

काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

राज्यात आजपासून काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आलाय. मॉन्सूनच्या प्रवासाला पोषक असं वातावरण तयार झालंय. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह आजपासून पाऊस होण्याची शक्यता आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.         

राजधानी दिल्लीत 'आया सावन झुमके'

दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्यानां कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळाला. हवामानात अचानक बदल झाल्यानंतर अनेक ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस झाला. वादळ इतकं जोरदार होते की अनेक ठिकाणी झाडं आणि रस्त्याचे खांब तुटले.