मोदी सरकारची जवानांना सूट, गरज तेथे घुसून मारा

रविवारी जम्‍मू काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 2, 2018, 10:36 AM IST
मोदी सरकारची जवानांना सूट, गरज तेथे घुसून मारा title=

नवी दिल्ली : रविवारी जम्‍मू काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले. 

श्रीनगरहून सुमारे ३२ किलोमीटरवर लेथपुरा इथं असलेल्या सीआरपीएफच्या १८५ बटालियनवर हा हल्ला झाला. २ जवान यामध्ये जखमी झाले आहेत. चकमकीत २ दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशवासियांमध्ये राग आहे.

सरकाराने लष्कराला पाकिस्‍तान चोख उत्तर देण्यासाठी सूट दिली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्‍तानची सेना आणि बॉर्डर अॅक्‍शन टीमने कृष्‍णा घाटीमध्ये भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. नवीन वर्ष सुरु होण्याआधी पुन्हा जवानांवर हल्ला झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर संरक्षण मंत्री यांनी जवानांना पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी परवानगी दिली आहे. सरकारने म्हटलं की जवानांचं बलिदान व्यर्थ नाही जाणार. पाकिस्तानला याचं जोरदार उत्तर दिलं जाणार.

पुंछमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे काश्‍मीरमध्येच आहेच. जनरल रावत एलओसीवर सुरु असलेल्या ऑपरेशनल स्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथे आहेत. सध्या ते परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.