शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात मोदी सरकार अपयशी - प्रियंका गांधी

शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरतंय,

Updated: Dec 18, 2019, 08:17 PM IST
शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात मोदी सरकार अपयशी - प्रियंका गांधी title=

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरतंय, या शब्दात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज कांद्याचा दर दीडशे रुपये किलो झाला आहे. महागाईने सामान्य जनता बेजार झाली आहे. महिलांना सुरक्षा देण्यातही नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरत असल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

खोटं बोलण्याशिवाय आणि भाषणबाजी कऱण्य़ाशिवाय नरेंद्र मोदी सरकार काहीच करू शकलेलं नाही, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारवर नागरिकत्व सुधारणा कायदा सुधारणा कायद्यावरून टीका केली होती. अनेक दिवसानंतर प्रियंका गांधी राष्ट्रीय मुद्यांवर सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत.