नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी बुधवारी मोठी घोषणा करणार असल्याची माहिती दिली. त्यांनी देशाला संबोधित करत म्हटलं की, भारत अंतराळात ही महाशक्ती बनला आहे. भारताने फक्त ३ मिनिटात एक उपग्रह पाडलं आहे. अंतराळात असं उपग्रह पाडणारा भारत चौथा देश बनला आहे. भारताने देशातच हे अँटी मिसाईल बनवलं आहे.
१. भारताने एक लाईव सॅटेलाईट पाडलं आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत चौथा देश बनला आहे.
२. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, भारताने अंतराळात एक उपग्रह पाडला. या सगळ्या मिशनला मिशन शक्ती असं नाव देण्यात आलं होतं. हे मिशन अवघड होतं. पण वैज्ञानिकांनी ते यशस्वी करुन दाखवलं. त्यानंतर भारत या क्षेत्रात आता महाशक्ती बनला आहे.
३. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, LEO सॅटेलाईट पाडण्यासाधी आधीच योजना केली होती. त्यानंतर ३ मिनिटात हे उपग्रह पाडलं.
४. महत्त्वाचं म्हणजे हे उपग्रह पाडण्यासाठी भारतातच विकसित करण्यात आलेलं तंत्रज्ञान वापरण्यात आलं.
५. मोदींनी म्हटलं की, आज आपल्याकडे असलेल्या उपग्रहामुळे कृषी, संरक्षण, सुरक्षा, संचार क्षेत्रात मदत होत आहे. पण अँटी सॅटेलाईट निर्माण करणारा भारत चौथा देश बनला आहे.