Crime News: मोबाइलसाठी अल्पवयीन मैत्रिणीला विकलं, तिघांनी शेतात नेऊन बलात्कार केला अन् नंतर गंगा नदीत...; पोलीसही चक्रावले

Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलांनीच आपल्या मैत्रिणीला 20 हजारात विकून टाकलं होतं. ज्या तीन मित्रांनी त्यांनी तिला विकलं होतं, त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर नदीत फेकून दिलं.   

Updated: Mar 15, 2023, 02:26 PM IST
Crime News: मोबाइलसाठी अल्पवयीन मैत्रिणीला विकलं, तिघांनी शेतात नेऊन बलात्कार केला अन् नंतर गंगा नदीत...; पोलीसही चक्रावले title=

Crime News: उत्तर प्रदेशात गाजीपूर येथील एक धक्कादायक घटना समोर आणली आहे. चार अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा संपाजनक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार मुलांना ताब्यात घेतलं असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे आरोपींनी फक्त एका मोबाइलसाठी हे कृत्य केलं आहे.  

गाजीपूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदपूर क्षेत्रात असणाऱ्या रस्तीपूर येथे एका इमारतीचं काम सुरु होतं. येथील एका मजूराने आजारी पडल्यानंतर आपल्या जागी आपल्या अल्पवयीन मुलाला काम करण्यासाठी पाठवलं. दरम्यान या मुलाने बंगल्याच्या मालकाच्या अल्पवयीन नातीला आपल्या जाळ्यात ओढलं. यानंतर त्याने कोचिंगला जाताना आणखी एका अल्पवयीन आरोपीसह बाईकवर बसवून नेलं. 

दोघे अल्पवयीन आरोपी मुलीला घेऊन चौबेपूरला गेले. येथे त्यांचे तीन मित्र त्यांना भेटले. त्यांनी अल्पवयीन मुलीला त्यांच्या हवाली केलं. यानंतर तिघे आरोपी मुलीला घेऊन वाराणसी येथे हायवेच्या शेजारी असणाऱ्या एका शेतात नेलं. तिथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला घेऊन दिवसभर वाराणसीत फिरत राहिले. 

पोलीस पकडतील या भीतीने त्यांनी मुलीला वाराणसीमधील विश्व सुंदरी पुलावरुन गंगा नदीत फेकून दिलं. मासे पकडणाऱ्या मच्छिमारांनी तिला वाचवलं आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. मुलीला बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. मुलगी शुद्धीत आल्यानंतर तिने सांगितलेल्या फोन नंबरच्या माध्यमातून कुटुंबाला घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. 

मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता, मोबाइल फोन खरेदी करण्यासाठी आपण मुलीला 20 हजार मित्रांना विकलं अशी माहिती दिली.