पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत घट, डेटिंग वेबसाईट मालामाल; थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबध

जेव्हा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लावला जातो तेव्हा पुरुषांच्या अंजरवेअर विक्रीवरुन देखील काही निष्कर्ष काढले जातात. 

Updated: Sep 18, 2023, 04:58 PM IST
पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत घट, डेटिंग वेबसाईट मालामाल; थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबध  title=

Mens underwear index : अंडरवेअर या फक्त पुरुषांचे शरीर झाकण्यासाठीच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. कारण, पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीवरुन देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लावला जातो. सध्या पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत घट झाली असून डेटिंग वेबसाईट मालामाल झाल्या आहेत.  पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीची  देशाच्या अर्थव्यवस्थेशी  नेमकं काय कनेक्शन आहे जाणून घेवूया. 

देशाच्या अर्थव्यवस्थेसह पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत घट होण्याचा परिणाम अनेक गोष्टींवर पडतो. एका अहवालानुसार, भारतात अंडरवेअरच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अंडरवेअर विक्रीत घट होताच डेटिंग वेबसाइट्स प्रसिद्धी वाढली आहे. इकॉनॉमी इंडिकेटर्सनुसार जाणून घेवूया यामागचे लॉजिक.

देशात अंडरवेअर विक्रीत मोठी घट

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार देशात अंडरवेअर विक्रीत मोठी घट झालेय. रूपा, डॉलर, जॉकीसह देशातील सर्व अंडरवेअर ब्रँडना याचा फटका बसला आहे. Mens underwear index नुसार जेव्हा देशात आर्थिक मंदी असते तेव्हा सर्व प्रथम याचा परिणाम  अंडरवेअर विक्रीवर होतो. मंदीच्या काळात  लोक अंतर्वस्त्रासारख्या अदृश्य वस्तू खरेदी करणे टाळतात असा तर्क Mens underwear index मध्ये मांडण्यात आला आहे. 

अंडरवेअर विक्रीत घट झाल्याचा डेटिंग वेबसाईटच्या कमाईशी काय संबध?

अंडरवेअर विक्रीत घट झाल्याचा डेटिंग वेबसाईटच्या कमाईशी काय संबध? असा प्रश्न उपस्थित होतो. याचा संबध लोकांच्या कमाईशी देखील आहे. मंदीच्या काळात हजारो लोकांच्या नोकऱ्या जातात. मंदीत नोकरीत गमावल्यामुळे अनेकांना घरी बसावे लागते. अशा स्थितीत घरी आपला वेळ घालवण्यासाी तसेच नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अनेकजण डेटिंग वेबसाईट्सचा आधार घेतात. स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी लोक आपला अधिकांश वेळ हा  डेटिंग वेबसाईट्सवर घालवतात. परिणामी युजर्सची संख्या वाढल्याने याचा मोठा फायदा डेटिंग वेबसाईट्सना होत आहे. 2009 मध्ये अमेरिकेत  आर्थिक मंदी आली होती. या मंदीच्या काळातही  Match.com या अमेरिकन डेटिंग वेबसाईटचा चौथ्या तिमाहीचा नफा गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक होता. देशात आर्थिक मंदी असतानाही ही कंपनी मालामाल झाली होती. 

मंदीच्या काळात डेटिंग वेबसाईटची तगडी कमाई

Match.com या अमेरिकन डेटिंग वेबसाईटने  मंदीच्या काळातही तगडी कमाई करत नवा विक्रम रचला. अमेरिकेपासून युरोपपर्यंत मोठे देश मंदीच्या संकटात सापडले होते. अमेरिकेचे बँकिंग क्षेत्रही डबघाईला आले होते. अनेक बड्या बँकाना टाळे लागले होते. अशा परिस्थितीत डेटिंग वेबसाईट मात्र बक्कळ कमाई करत होत्या. सध्या तशीच काहीशी स्थिती आहे. भारतात अंडरवेअर विक्रीत मोठी घट झालेय.तर, दुसरीकडे डेटिंग वेबासाईटचे उत्पन्न मात्र, वाढले आहे.