छत्तीसगड : नव्या लग्नाची नवी स्वप्न असतात. संसार सुखाचा व्हावा असं दोन्ही कुटुंबाला वाटत असतं. पण एक पती आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी नाईलाज झाला आहे. या घटस्फोटाचं कारण ऐकलं तरी तुम्ही चकीत व्हाल.
सासरी आलेली नववधून 11 व्या दिवशी जी माहेर गेली ती परत आलीच नाही. तिने कारण देताना घरी परतण्यासाठी शुभ मुहूर्त नाही असं सांगून टोलवलं. शुभ मुहूर्तावर लग्नाला 11 वर्षे उलटूनही पत्नी माहेरीच राहिली. त्यामुळे सगळाच घोळ झाला.
पत्नीला आणण्यासाठी पती सतत माहेरी जात होता. मात्र पत्नी त्याला सासरी येण्यासाठी आता शुभ मुहूर्त नाही असं उत्तर देऊन परत पाठवत राहिली. अखेर वैतानगलेल्या पतीनं न्यायासाठी कोर्टात धाव घेतली. पतीला कोर्टानं घटस्फोटासाठी हिरवा कंदील दिला आहे. छत्तीसगडचे न्यायमूर्ती बिलासपूर उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा अनोखा फर्मान काढलं. शुभ मुहूर्तावर लग्नाला 11 वर्षे उलटूनही पत्नी माहेरीच राहिली.
पती जेव्हा पत्नीला घ्यायला जायचा तेव्हा पत्नी अजून शुभ मुहूर्त नसल्याचे सांगून त्याच्यासोबत जायला नकार देत होती. आता या प्रकरणात बिलासपूर कोर्टाने घटस्फोटाचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि रजनी दुबे यांच्या खंडपीठाने या अजब कारणाचा अभ्यास केला. शुभ मुहूर्त हा चांगल्या कामांसाठी वापला जातो. मात्र या पत्नीनं त्याचा आधार घेऊन चुकीचा वापर सांगण्यात आलं.
हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 (IB) अंतर्गत घटस्फोट मंजूर करण्यात आला. या प्रकरणात पत्नीची चूक असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणी पतीला घटस्फोट घेण्यासाठी मंजुरी मिळाली.
संतोष सिंह यांचं 2010 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर 11 व्या दिवशी पत्नी आपल्या माहेरी गेली. ती तब्बल 11 वर्ष उलटली तरी सासरी आलीच नाही. शुभ मुहूर्त नसल्याचं कारण देऊन पत्नीने सासरच्या घरी येण्यास नकार दिला.
संतोष यांनी अखेर पत्नीचे हे सगळे प्रकार पाहून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र तिथे त्यांना यश मिळालं नाही. अखेर न्यायासाठी ते हाकोर्टात गेले. दुसरीकडे पत्नीने यावर उत्तर म्हणून जेव्हा शुभ मुहूर्त होता तेव्हा पती आणायला आला नाही असं उत्तर दिलं. या अनोख्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.