Medicine Price Hike: महागाईचा आणखी एक झटका, पॅरासिटामॉलसह या औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार

Medicine Price Hike : ताप, संसर्ग, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचाविकार, अशक्तपणा यांवर उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती वाढणार आहेत. यामध्ये पॅरासिटामॉल, फेनोबार्बिटोन, फेनिटोइन सोडियम, अजिथ्रोमाइसिन, सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइड आणि मेट्रोनिडाझोल यांसारख्या औषधांचा समावेश आहे.

Updated: Mar 26, 2022, 09:15 PM IST
Medicine Price Hike: महागाईचा आणखी एक झटका, पॅरासिटामॉलसह या औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार title=

Medicine price Hike : पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरनंतर आता जीवनावश्यक औषधांना ही महागाईचा तडाखा बसला आहे. एप्रिलपासून 800 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. यामध्ये ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचा रोग आणि अशक्तपणा यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचाही समावेश आहे. 

पुढील महिन्यापासून पेनकिलर आणि पॅरासिटामॉल, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारखी अत्यावश्यक औषधे महाग होणार आहेत. केंद्र सरकारने या औषधांच्या किमती वाढवण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) नुसार, या औषधांच्या किंमतीत वाढ घाऊक महागाई दर (WPI) च्या आधारावर केल्या गेल्या आहेत.

कोरोना महामारीपासून औषध उद्योग सातत्याने औषधांच्या किंमती वाढवण्याची मागणी करत होता. NPPA ने अनुसूचित औषधांच्या किंमतीत 10.7 टक्के वाढ मंजूर केली आहे. आवश्‍यक औषधांचा समावेश शेड्यूल ड्रग्जमध्‍ये केला जातो आणि त्‍यांच्‍या किंमती नियंत्रित असतात. परवानगीशिवाय त्यांच्या किंमती वाढवता येणार नाहीत. ज्या औषधांच्या किंमती वाढणार आहेत त्यात कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे.

फार्मा उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, गेल्या दोन वर्षांत काही प्रमुख API च्या किमती 15 ते 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलच्या किमती 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याच वेळी, सिरप आणि तोंडावाटे घेतली जाणारे इतर अनेक औषधे आणि वैद्यकीय अनुप्रयोगांमध्ये वापरल्या जाणार्‍या ग्लिसरीनच्या किंमती 263 टक्के आणि पॉपीलीन ग्लायकोल 83 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. वाढत्या किमती पाहता, गेल्या वर्षी 2021 च्या अखेरीस औषध उद्योगाने केंद्र सरकारला औषधांच्या किमती वाढवण्याची विनंती केली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, 1000 हून अधिक भारतीय औषध निर्मात्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका लॉबी गटाने सरकारला विनंती केली होती की सर्व विहित फॉर्म्युलेशनच्या किमतींमध्ये 10% वाढ त्वरित प्रभावाने करण्याची परवानगी द्यावी. तसेच सर्व नॉन-शेड्यूल औषधांच्या किमतीत 20% वाढ करण्याची मागणी केली होती.