Mole Astrology : महिलांच्या शरीरावर याठिकाणी तीळ असेल तर समजा नशीब बदलणारे

आपल्या शरीरावर तीळ असणं सामान्य मानलं जातं. आपल्या शिरीरावर काही तीळ हे जन्मजात असतात तर काही तीळ हे येत जात असतात.

Updated: Aug 16, 2022, 07:01 PM IST
Mole Astrology : महिलांच्या शरीरावर याठिकाणी तीळ असेल तर समजा नशीब बदलणारे title=

Mole Astrology and it's meaning : असं म्हणतात आपल्या भाग्यरेषांनी जसा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो, तसंच आपल्या शरीरावरील विविध अवयवांवर असणारे तीळ आपल्या भाग्याबाबत संकेत देत असतात. शास्त्रानुसार आपल्या शरीरावरील विविध अवयवांवरील तीळ आपल्या चारित्र्याबाबत विविध गोष्टी सांगत असतात. जाणून घेऊयात आपल्या पोटावर बेंबीपाशी, हाताच्या बोटांच्या आसपास असणाऱ्या तिळांबाबत ज्यांना धन आणि समृद्धीचं किंवा अशुभतेच प्रतीक मानलं जातं.    

आपल्या शरीरावर तीळ असणं सामान्य मानलं जातं. आपल्या शिरीरावर काही तीळ हे जन्मजात असतात तर काही तीळ हे येत जात असतात. भारत आणि चिनी शास्त्रानुसार शरीरावरील विविध अवयवांवरील तीळ असण्याचं विशिष्ट महत्त्व आहे. हे तीळ आपल्या भाग्याबाबत सूचक माहिती देत असतात. सर्वसाधारणपणे तीळ हे काळ्या रंगाचे असतात. मात्र काही तीळ हे लाल किंवा भुऱ्या रंगाचेही असू शकतात. 

करंगळीवरील तीळ - 

असं म्हणतात जर तुमच्या करंगळीवर तीळ असेल तर तुम्ही धनवान व्यक्ती आहात. मात्र अशांच्या आयुष्यात अशांतता आणि त्रास देखील असतो.

पोटावर तीळ असणं 

असं म्हणतात की ज्या महिलांच्या पोटावर तीळ असतो त्या महिलांना चांगल्या संतानप्राप्तीचं सुख लाभतं. जर महिलेच्या पोटावर बरोबर छातीखाली तीळ असेल तर ती महिला चांगलं आयुष्य घालवते.  

बेंबीच्या वरच्या भागावर तीळ असणं  

बेंबीच्या वरच्या भागात तीळ असल्याचं ती व्यक्ती खवय्या मनाली जाते. मात्र बेंबीच्या अगदी जवळ किंवा बेंबीमध्ये तीळ असल्यास अशी व्यक्ती धन आणि संपत्ती प्राप्त करते. अशा व्यक्तींवर लक्ष्मीची कृपा राहते आणि अशा व्यक्ती आनंदी आयुष्य घालवतात. 

बेंबीच्या खालच्या भागात तीळ असणं

बेंबीच्या जराशा खालच्या भागात तीळ असेल तर शास्त्रानुसार अशा व्यक्तींना अतिशय भाग्यशाली मानलं जातं. अशा व्यक्तींना कधीही धनाची कमतरता भासत नाही. अशा व्यक्तींची जीवनशैली सामान्य राहते. मात्र, वेळ आल्यावर आपल्याकडील संपत्तीचा वापर करून अशा व्यक्ती मोठी कामं सहज करून घेऊ शकतात. अशी माणसं हलक्या कानाची नसतात. अशांवर तुम्ही विश्वास ठेऊन तुमच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करू शकतात. 

समुद्रशास्त्र काय म्हणतं ? 

समुद्र शास्त्रानुसार पोटावरील तीळ अशुभ मानला जातो. हा तीळ दुर्भाग्याला सूचित करणारा मानला जातो. अशा व्यक्ती खाण्यापिण्याच्या शौकीन असतात. तीळ जर बेंबीच्या डाव्या बाजूला असेल तर अशा व्यक्तींना पोटाच्या व्याधी सतावू शकतात. ज्यांच्या बेंबीच्या खाली तीळ असतो अशांना लैंगिक संक्रमित रोगाची शक्यता अधिक असते. पोटावरील तीळ जरी अशुभ मानला गेला, तरीही बेंबीच्या अत्यंत जवळ असलेला तीळ धन आणि संपत्तीला दर्शवत असतो.  
 
ज्योतिष शास्त्रानुसार शरीरावर 12 पेक्षा अधिक तीळ असणं चांगलं नसतं. शरीरावरील विविध अवयवांवर असलेल्या तिळांबाबत विविध धारणा आहेत. 

(विशेष सूचना - या  लेखात दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. वरील माहितीच्या सत्य असत्यतेबाबत Zee 24 Taas कोणतीही अधिकृत पुष्टी करत नाही. या लेखातील कोणतीही माहिती आयुष्यात वापरायची झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

meaning of mole mark on various body parts of women belly mole stomatch mole lady finger mole