Railway Recruitment 2022 : रेल्वेत मेगा भरती!आताच अर्ज करा

Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेने (Central Railway Recruitment) 2422 अप्रेंटिस पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवलेत.ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते मध्य रेल्वेची (Central Railway) अधिकृत साइट rrccr.com वर अर्ज करू शकतात.

Updated: Dec 15, 2022, 08:06 PM IST
Railway Recruitment 2022 : रेल्वेत मेगा भरती!आताच अर्ज करा  title=

Central Railway Recruitment 2022: रेल्वेने तरूणांसाठी बंपर भरती आणली आहे. 2422 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहे.या भरतीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात आजपासून झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर इच्छूक असाल तर आताच अर्ज करू शकता.

मध्य रेल्वेने (Central Railway Recruitment) 2422 अप्रेंटिस पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवलेत.ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते मध्य रेल्वेची (Central Railway) अधिकृत साइट rrccr.com वर अर्ज करू शकतात. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबर 2022 रोजी सुरू झाली आहे आणि 15 जानेवारी 2023 रोजी बंद होईल. 

किती जागा आहेत? 

  • मुंबई क्लस्टर (MMCT): 1659 
  • भुसावळ क्लस्टर: 418 
  • पुणे क्लस्टर: 152 
  • नागपूर क्लस्टर: 114 
  • सोलापूर क्लस्टर: 79 

उमेदवार 10 वी पास हवा

मध्य रेल्वेच्या (Central Railway) या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून 50% गुणांसह समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.यासह संबंधित व्यापारातील राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा व्यावसायिक प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद किंवा व्यावसायिक प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद किंवा व्यावसायिक प्रशिक्षणासाठी राज्य परिषदेतील तात्पुरते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे आवश्यक असणार आहे.  

शुल्क किती?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, OBC, EWS उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. याशिवाय महिला उमेदवारांसह इतर श्रेणींसाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अशी होणार निवड 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. व्यापारातील आयटीआय गुणांसह 10वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानुसार तरूणांची निवड होणार आहे. 

दरम्यान तुम्ही जर अजूनही अर्ज केला नसेल, तर आताच अर्ज करा. ही भरती तरूणांसाठी सुवर्णसंधी आहे.