मास्क वापरल्याने डोकेदुखी, लगेच ही पद्धत अवलंबा; जाणून घ्या का आहे आवश्यक ?

 Mask Causing Headache: कोराना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.  

Updated: Oct 12, 2021, 10:47 AM IST
मास्क वापरल्याने डोकेदुखी, लगेच ही पद्धत अवलंबा; जाणून घ्या का आहे आवश्यक ? title=

मुंबई : Mask Causing Headache: कोराना विषाणूपासून ( coronavirus) संरक्षण करण्यासाठी, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. तथापि, बऱ्याचदा असे घडते की मास्क घातल्याने तीव्र डोकेदुखीची समस्या सुरु होती. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारची समस्या बहुतेक लोकांना सतत मास्क घातल्याने जाणवते, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मास्क घालणे टाळाल.

लसीकरणानंतरही (Vaccination)मास्क लावयाला हवा. मास्क, सॅनिटायझर (Sanitizer) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा अवलंब करायला हवा.

जर तुम्हाला हे आजार असतील

ज्या लोकांना सर्दी, खोकला, अ‍ॅलर्जी, दमा किंवा त्वचेवर पुरळ या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी सतत मास्क घालणे कठीण आहे. तज्ज्ञांच्या मते, बराच काळ मास्क घातल्याने  Temporomandibular jointमध्ये (TMJ)  वेदना होऊ शकते.

हे तुमच्या खालच्या जबड्याला skullशी जोडते. मास्क घातल्यावर ही समस्या जाणवू लागते जेव्हा ते स्नायू आणि टिशूज हालचालीला प्रतिबंध करते. जबड्याची हालचाल प्रभावित होते, तेव्हा मज्जातंतू मेंदूला वेदनांचे संकेत देते (Pain Signals). यामुळे डोकेदुखी होते.

आपण या पद्धतींचा अवलंब करू शकता

मास्कमधून डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही काही मार्ग अवलंबू शकता-

- कानाला जास्त घट्ट नसलेला मास्क घाला. यामुळे त्रासापासून सुटका होऊ शकते. कान दुखायचा थांबतो आणि डोकेदुखीतूनही सुटका होते.

- जबड्याचे स्नायू आणि दातांमध्ये घट्टपणामुळे तणाव आणि चिंता वाढू शकते. तुमच्या जबड्याचे स्नायू आणि दात रिलॅक्स असले पाहिजेत. कारण हे विश्रांतीचे सूचक आहेत.

- वाईट पद्धतीमुळे मास्कचा वापर केला तर मास्क घातल्याने  Temporomandibular jointमध्ये (TMJ)  वेदना होऊ शकते. खराब पवित्रामुळे स्नायूंचा ताण वाढतो. त्यामुळे प्रसन्न राहण्यासाठी योग्य पद्धत अवलंबा.

- ध्यानधारण (मेडिटेशन) करा, हलकी पद्धतीने माने हलवा किंवा फिरवा तसेच गालांना मालिश करा. 

लसीकरणानंतरही मास्क घालणे फार महत्वाचे आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडण्याचा धोका घेऊ नका. हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कोरोनापासून संरक्षणासाठी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करावा. चेहऱ्यावरचा मास्क योग्य पद्धतीने न लावल्यास त्याचा काही उपोग होत नाही. आपले नाक आणि तोंड पूर्णपणे झाकणारा मास्क लावायला हवा. ट्रिपल लेयर मास्क (Triple Layer Mask) किंवा सर्जिकल मास्क अधिक उपयुक्त आहे.