या बॅंकेत होमलोनवर मिळतेय १० हजाराची कॅशबॅक

आयसीआयसीआय बँकेने ३० नोव्हेंबरपर्यंत गृहकर्जदारांसाठी 'कॅशबॅक' योजना आणली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 16, 2017, 06:39 PM IST
या बॅंकेत होमलोनवर मिळतेय १० हजाराची कॅशबॅक  title=

नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅक विविध ऑफर्स आणत आहेत. आयसीआयसीआय बँकेने ३० नोव्हेंबरपर्यंत गृहकर्जदारांसाठी 'कॅशबॅक' योजना आणली आहे.

ग्राहकांना २०% कॅशबॅक

या योजनेअंतर्गत ज्या ग्राहकांनी नवीन गृहकर्ज घेतले आहे किंवा सध्याच्या कर्जामध्ये ते हस्तांतरित करतील त्यांना २०% (१० हजार रुपयापर्यंत) कॅशबॅक मिळणार आहे.

१ सप्टेंबर २०१७ पासून ऑफर

ही कॅशबॅक रक्कम ग्राहकांच्या आयसीआयसीआय क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर ३० हजार रुपयांच्या किमान किंमतीवर आधारित आहे. ही ऑफर सप्टेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत राहणार असल्याचे बॅंकतर्फे सांगण्यात आले आहे.