पंधरा वर्षानंतर आला असा योग : मंगळ पृथ्वीच्या जवळ

15 वर्षानंतर जुळून आला हा योग 

पंधरा वर्षानंतर आला असा योग : मंगळ पृथ्वीच्या जवळ title=

मुंबई : आज मंगळवार ३१ जुलै रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ७५ लक्ष किलोमीटर अंतरावर येणार असल्यामुळे  खगोलप्रेमीना मंगळ निरीक्षणाची सुवर्णसंधी मिळणार  असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, मंगळ जेव्हा पृथ्वीपासून दूर जातो त्यावेळी तो पृथ्वीपासून ४० कोटी १० लक्ष किलोमीटर अंतरावर जातो.

सध्या सर्वांना साध्या डोळ्यानी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात उत्तराषाढा नक्षत्रात  मंगळ ग्रहाचे  सुंदर  दर्शन होऊन  तो  रात्रभर आकाशात पाहता येईल. तसेच तो लालसर रंगाचा दिसत असल्याने सर्वांना सहज ओळखतां येईल. पंधरा वर्षांपूर्वी २७ आगस्ट २॰॰३  मंगळ ग्रह पृथ्वीच्साजवळ ५ कोटी ५७ लक्ष किलोमीटर अंतरावर आला होता. आजच्या नंतर पुन्हा सतरा वर्षानी ११ सप्टेंबर २०३५ रोजी मंगळ  पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ६९ लक्ष किलोमीटर अंतरावर  येणार आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळ ग्रहाकडे पाठवलेले मंगळयान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळग्रहाकडे पोहोचले होते असेही श्री. सोमण यांनी सांगितले.