मुंबई: पाणीपुरी आणि तरुणी यांचं एक अनोखं नातं आहे. पाणीपुरी कुणाला आवडत नाही. पण पाणीपुरीचं वेड एवढं भयंकर असेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. या तरुणीनं चक्क आपल्या लग्नात दागिने चढवण्याऐवजी पाणीपुरीच्या पुरांचा साज अंगावर चढवला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हो. या तरुणीनं चक्क अंगावर दागिन्यांऐवजी पाणीपुरीच्या पुऱ्यांची माळ घातली आहे. या नववधूचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लग्नात अनेक गमतीजमती होत असतात. नटण्याचं आणि सजून सुंदर फोटो काढायचं स्वप्न प्रत्येक मुलीचं असतं. मात्र या नववधून सगळ्या गोष्टी बाजूला सारून थेट पाणीपुरीच्या पुऱ्याच गळ्यात घातल्या. इतकच नाही तर डोक्यावर पुऱ्याचा मुकूट चढवला. या नववधूची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगली आहे.
हा व्हिडीओ पाहून शौक बडी चीज आहे ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली. पाणीपुरीची आवड इतक्या टोकाला जाईल आणि लग्नाच्या मंडपात असा प्रकार पाहायला मिळेल असा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही थक्क झाले. एक लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.