आधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतची मुदत वाढण्याचे संकेत

आधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत वाढ करण्याचे संकेत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिले आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 7, 2018, 10:13 AM IST
आधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतची मुदत वाढण्याचे संकेत title=

नवी दिल्ली : आधार जोडणीची ३१ मार्चपर्यंतच्या मुदतीत वाढ करण्याचे संकेत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिले आहे. 

मुदत वाढण्याची शक्यता

आधार कार्डप्रकरणी सुनावणी संपवण्यापूर्वी आणखी थोडावेळ हवा आहे, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं. यामुळे विविध योजनांसाठी ३१ मार्चपर्यंत बंधनकारक केलेल्या आधार जोडणीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

याआधीही मुदतवाढ

आधार जोडणीला यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्यासाठी आम्ही मुदतवाढीबाबत या महिना अखेरीस पुन्हा विचार करू. यामुळे याचिकाकर्ते आपलं म्हणणं पूर्णपणेमांडू शकतील, असं अटॉर्नी जनरल वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. 

तेचतेच मुद्दे मांडण्यास कोर्टाचा मज्जाव

केंद्र सरकारने आधार जोडणीबाबत मांडलेल्या भूमिकेला सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानेही सहमती दर्शवली. तसंच याचिकाकर्त्यांच्या वकिलांना तेचतेच मुद्दे मांडण्यास कोर्टाने मज्जाव केला. या प्रकरणी आजही सुनावणी होणार आहे.