निवडणूक निकालानंतर राजस्थानातील मराठी लोकांची प्रतिक्रिया

काय वाटतंय मराठी लोकांना पाहा

Updated: Dec 12, 2018, 07:41 PM IST
निवडणूक निकालानंतर राजस्थानातील मराठी लोकांची प्रतिक्रिया title=

जयपूर : विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार बनत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. 199 पैकी काँग्रेसने 99 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला 73 आणि इतर 27 जागांवर विजयी झाले आहेत. राजस्थानमध्ये सध्या मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. वसुंधरा राजे यांच्यानंतर आता राज्याच्या नव्य़ा मुख्यमंत्र्यांबाबत लोकांमध्ये उत्सूकता आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार यावरुन काँग्रेसमध्ये आता वाद सुरु झाला आहे.

जयपूरमध्ये मराठी लोकांची सुमारे एक हजार कुटुंबे आहेत. राजस्थानी लोकांबरोबरच त्यांच्या मनातही भाजपच्या वसुंधराराजे सरकारवर रोष होता. राजस्थानात सत्ता बदल झाल्यानंतर मराठी लोकांना या विषयी काय वाटतं हे देखील आम्ही जाणून घेतलं आहे. बातमीच्या शेवटी पाहा व्हिडिओ

जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत 2 गट पाहायला मिळाले. अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याबाबत निर्णय घेणार आहेत. बुधवारी संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. आमदारांच्या बैठकीत केंद्रीय पर्यवेक्षक अविनाश पांडे आणि केसी वेणुगोपाल हे देखील उपस्थित राहणार आहेत. आमदारांचं मत ते राहुल गांधींना कळवणार आहेत. राहुल गांधी यांच्यापुढे देखील हे आव्हान असणार आहे. पण अशोक गहलोत या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. पक्षाचे महासचिव अशोक गहलोत यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. 

सचिन पायलट यांचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. जनता वसुंधरा सरकारवर नाराज होती म्हणून त्यांनी भाजप विरोधात मतदान केलं. राजस्थानमध्ये 101 या बहुमताच्या आकड्यापासून 2 जागांनी मागे आहे. त्यामुळे अपक्षांना विशेष महत्त्व आहे. काँग्रेसचे अनेक बंडखोर नेते देखील विजयी झाले आहेत. त्यांनी घर वापसीचे संकेत दिले आहे. काँग्रेसच्या 8 बंडखोर आमदारांनी अशोक गहलोत यांच्यासमोर त्यांचं म्हणणं मांडलं. अशोक गहलोत यांच्यावर त्यांनी विश्वास दर्शवला आहे. बीएसपी अध्यक्ष मायावती यांनी मध्यप्रदेशसह राजस्थानमध्ये देखील काँग्रेसला समर्थन केलं आहे.