नवी दिल्ली : जर तुम्ही पिझ्झा प्रेमी असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. अनेकदा आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर कार्डपेमेंट करतो. तर असं करताना सावधान. नुकतीच ताजी घडलेली घटना समोर आली आहे. नवी दिल्लीतील ग्रेटर नॉएडाच्या सिटी मॉलमध्ये लोकप्रिय पिझ्झा चेन आहे. जेथे एका खवय्याने पिझ्झा ऑर्डर करून कार्ड पेमेंट केल्यानंतर चक्क अकाऊंटमधील लाखो रुपयांची चोरी झाली आहे
पोलिसांनी या प्रकरणात पिझ्झा शॉपमध्ये काम करणारे कर्मचारी अभिषेक आणि त्याचा मित्र अनिकेश प्रसादला अटक केलं आहे. या पिझ्झा शॉपचे एरिया हेड नितीन महाजन यांना ग्राहकांनी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. ज्यानंतर सीटीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. त्यावेळी हे दोघं आरोपी पिझ्झाचं पेमेंट केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरी करत असल्याचं स्पष्ट झालं.
पिझ्झा शॉपमध्ये काम करणारा अभिषेक ग्राहकांच्या कार्ड पेमेंटवेळी पिन बघायचा आणि आपला मित्र अनिकेश प्रसादला पाठवायचा. यानंतर दोघं मिळून त्यांच्या खात्यातून पैसे काढत असतं.
पोलिसांनी अभिषेकचा मोबाइल तपासला असता तो ग्राहकांचा सिक्रेट पिन अनिकेशला पाठवत असल्याचं निदर्शनास आलं. यामुळे ऑनलाईन पिझ्झाचं काय तर इतर कोणतीही गोष्ट खरेदी करताना सतर्क राहा. सावधान राहा....
व्यवहार करण्यापूर्वी एकदा आपलं इंटरनेट कनेक्शन पासवर्ड तपासून पाहा. ते योग्य प्रोटेक्टेड एरियात आहे की नाही.
ऑनलाइन ट्रांझेक्शन करताना साइटची सुरक्षितता तपासून पाहा. योग्य युआरएलवरचं पेमेंट करा.
वित्तीय ट्रांसेक्शनकरता कठीण पासवर्डचा वापर करा. पासवर्ड अंक, अक्षर आणि साईन यांनी मिक्स असं आठ अक्षरांच असणं गरजेचं आहे.
वायरस आणि सायबर अटॅकच्यावेळी एँटी व्हायरस बहुत कामी येणार आहे. स्वस्त किंवा फुकट असलेले एँटी व्हायरस वापरणं टाळा. कायमच एँटी व्हायरस अपडेट करत राहा.