ISROमध्ये सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांसाठी भरती सुरु

तुम्हालाही मिळू शकते नोकरीची सुवर्णसंधी...

Updated: Feb 18, 2020, 08:51 AM IST
ISROमध्ये सरकारी नोकरीची संधी; 'या' पदांसाठी भरती सुरु title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : ISRO Technician Recruitment 2020: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) मध्ये टेक्निशियन आणि टेक्निकल असिस्टेंट, हिंदी टायपिस्ट, लायब्ररी असिस्टेंटसह अनेक पदांसाठी सरकारी नोकरीसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी आवश्यक ती योग्यता असल्यास तुम्हीही यासाठी अर्ज करु शकता. या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला मॅट्रिक्स लेव्हल-७ नुसार वेतन देण्यात येईल. उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि स्लिल टेस्टच्या आधारे केलं जाणार आहे.

भरतीबाबत महत्त्वाच्या गोष्टी -

पदं - टेक्निशियन, टेक्निकल असिस्टेंट, हिंदी टायपिस्ट, लायब्ररी असिस्टेंट आणि इतर 

रिक्त पदांची संख्या - १८२

पात्रता - १०वी, १२वी, ITI, Diploma, B.Sc pass

पे स्केल - लेवल - १, २, ३, ४, ७

वयोमर्यादा - १८ ते ३५ वर्ष 

येथे करा ऑनलाईन अर्ज

परीक्षा फी -

इस्त्रोमध्ये विविध पदांसाठी भरती करण्याऱ्या जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गात उमेदवाराला २५० रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि एसबीआय चालानद्वारे फी भरता येऊ शकते. याशिवाय कोणत्याही प्रवर्गातील महिला उमेदवार, एससी, एनटी, एक्स-सर्व्हिसमॅन आणि PWBD वर्गातील उमेदवारांना कोणतीही परीक्षा फी जमा भरावी लागणार नाही.

ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख १५ फेब्रुवारी २०२०पासून सुरु झाली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२०

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार याबाबत अधिक माहितीसाठी इस्त्रोच्या https://www.isro.gov.in वेबसाईटवर माहिती घेऊ शकतात. उमेदवाराला आपला ईमेल आणि मोबाईल नंबर स्पष्ट आणि योग्य देणं गरजेचं आहे.