कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं काँग्रेस मुक्त अभियान सुरु आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसमधून नेत्यांना मोठ्या प्रमाणात टीएमसीत प्रवेश देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसमध्ये नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी वाढली आहे. अशा स्थितीत ममता बँनर्जिंसोबत आपण युती केली नाही तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस रहाणार नाही अशी भीती स्थानिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधींसमोर व्यक्त केली. यांचे अनेक नेते पक्षातील गटबाजीला कंटाळून टीएमसीमध्ये सामिल होण्याच्या मार्गावर आहेत.