अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये घमासान, प्रवक्त्याची क्लिप समोर

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन घमासान सुरु झालंय.

Updated: Dec 2, 2017, 11:54 PM IST
अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये घमासान, प्रवक्त्याची क्लिप समोर title=

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन घमासान सुरु झालंय. अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिया ही इलेक्शन नसून सिल्केशन असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे माजी सचिव आणि गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय शहजाद पूनावाला यांनी केलाय.

पूनावाला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आलीय. पूनावाला यांनी शुक्रवारी संध्याकाळी माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांना फोन केला. यावेळी पूनावाला यांनी आपली व्यथा मांडत तिवारी यांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेस पक्ष राजकीय पक्ष नसून प्रोप्रायटरशिप असल्याचं तिवारींनी यांत म्हटलं.

तिवारी यांनी पूनावाला यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. शिवाय शहजाद पूनावाला यांचा त्यांनी क्रांतीकारी असाही उल्लेख केलाय. यावरुन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. झी मीडिया या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मात्र असं संभाषण झाल्याचं खुद्द शहजाद पूनावाला यांनी झी मीडियाला सांगितलंय.