मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक फोटो व्हायरल (PHOTO viral) होत असतात. असाच मध्यंतरी शॉर्ट राजीनाम्याचा फोटो व्हायरल झाला होता. हा राजीनामा पाहून प्रत्येक कर्मचारी पोट धरून हसला होता. कारण हा राजीनामा खुपच मजेशीर होता. आता असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत बँकेच्या खातेधारकाने जे केलंय ते पाहून बँक कर्मचाऱ्यांना हसू आवरता येत नाहीए. या फोटोमध्ये अस नेमकं काय आहे ते जाणून घेऊय़ात.
सोशल मीडियावर (Social media) दररोज काही ना काही व्हायरल होत असते. आता 'इंडियन बँके'च्या (Indian Bank) डिपॉझिट स्लिपचा (Deposite Slip) फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या डिपॉझिट स्लिपमध्ये खातेदाराने खात्यात रक्कम टाकण्यासाठी आपली सर्व माहिती लिहिली आहे. पण डिपॉझिट स्लिपमधील रकमेच्या कॉलममधील रकमेऐवजी त्याने जे लिहिले ते वाचून अनेकांना हसू आवरता येत नाही.
हे प्रकरण इंडियन बँकेच्या (Indian Bank) मुरादाबाद शाखेशी संबंधित आहे. वास्तविक, एक व्यक्ती बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेली होती. मात्र डिपॉझिट स्लिपमध्ये (Deposite Slip) सर्व माहिती बरोबर लिहिल्यानंतर रक्कमेच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची होती, पण तो तिकडे स्वत:ची तुला रास लिहून येतो. मात्र त्याने हे का लिहलं हे एकूण तुम्हाला धक्का बसेल.
खरं तर हिंदीत रक्कमेला राशी म्हणतात, त्यामुळे खातेधारकाचा असा समज झाला की, त्याला स्वत:ची रास सांगायची आहे.त्यामुळे तो रक्कमेच्या रकान्यात स्वत:ची रास लिहून येतो. सध्या स्लिपवर (Deposite Slip) बँकेचा शिक्का सोबत 12 एप्रिल ही तारीखही लिहली आहे, त्यामुळे ही चूक असूनही बँकर्सनी खातेदारांचे पैसे जमा केल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान हा फोटो ट्विटर युजर @NationFirst78 ने 16 एप्रिल रोजी शेअर केला होता. पण हा फोटो आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत. एका य़ुझरने लिहले की, हे लोक येतात कुठून? तर दुसऱ्याने लिहले की तुला राशीचे लोक असे पराक्रम करत राहतात? असेही लिहले आहे.