Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्याही हाती या प्रकरणात अनेक धागेदोरे लागत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला वेग येत आहे. मात्र आरोपी आफताब (Aftab poonawalla) या चौकशीत सारके जबाब बदलत आहेत. यामुळे पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आता आरोपीची नार्को टेस्ट (Narco Test) केली जाण्याची शक्यता आहे. मात्र तुम्हाला माहितीय का? नेमकी नार्को टेस्ट कशी केली जाते? या चौकशीत आरोपीच सत्य समोर येते का? हेच जाणून घेऊयात.
पूनावालाने (Aftab poonawalla) श्रद्धा वॉकरचा (Shraddha Murder Case) मोबाईल फोन आणि ज्या करवतीने तिची हत्या केली होती, त्याची खोटी माहिती देऊन तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे श्रद्धा हत्या प्रकरणात आफताब पूनावाला (Aftab poonawalla) पोलिसांना चुकीची माहिती देतअसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला होता. दिल्ली पोलिसांनी आज बुधवारी श्रद्धा हत्येप्रकरणी साकेत न्यायालयात आफताब पूनावालाची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली होती, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे न्यायालयाने परवानगी दिली नाही. आता 18 नोव्हेंबर रोजी आफताबची नार्को टेस्ट होणार की नाही याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. दरम्यान जर परवानगी मिळाली तर नार्को टेस्टच्या माध्यमातूनच श्रद्धाच्या हत्येचे रहस्य उकलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार तपासादरम्यान पोलिस पथकासोबत मानसोपचार तज्ज्ञ असतात. नार्को टेस्टमध्ये (Narco Test) एखाद्या औषधाच्या इंजेक्शनचा समावेश असतो, ज्यामुळे व्यक्ती ऍनेस्थेसियाच्या विविध टप्प्यात प्रवेश करते. हे एक कृत्रिम निद्रावस्था निर्माण करते, या अवस्थेत सामान्यत: जागरूक अवस्थेत उघड होणार नाही अशी माहिती उघड होण्याची अधिक शक्यता असते.
नार्को टेस्टमध्ये (Narco Test) एखाद्या व्यक्तीस सत्य औषध म्हणून ओळखले जाणारे सायकोएक्टिव्ह औषध दिले जाते. औषध रक्तात पोहोचताच आरोपी अर्ध बेशुद्ध अवस्थेत पोहोचतो. तथापि, काही प्रकरणांमध्ये, सोडियम पेंटोथॉलचे इंजेक्शन देखील दिले जाते. तपासादरम्यान न्यायवैद्यक तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर घटनास्थळी आहेत. यादरम्यान तपास पथक अर्धचेतन आरोपींना त्याच्या पॅटर्ननुसार प्रश्न विचारतात.
दरम्यान या प्रकरणात आफताब (Aftab poonawalla) आपले सतत जबाब बदलत आहे, त्यामुळे पोलिसांनी आता त्याची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. न्यायालयाने नार्को टेस्टला मंजूरी दिल्यास त्याची नार्को टेस्ट होणार आहे. आता जर या प्रकरणात नार्को टेस्ट (Narco Test) झाली तर तपासातून काय काय समोर येते हे पाहावे लागणार आहे.