'समूसा ले लो गलमा गलम', बाईकवर बसून जेव्हा दुकानदार विकू लागला समोसे... पाहा व्हिडीओ

या फेरीवाल्याची समोसा विकण्याची स्टाईल पाहूनच तुम्ही याचे फॅन व्हाल आणि म्हणाल...एक प्लेट समोसा दे!

Updated: Aug 30, 2021, 06:33 PM IST
'समूसा ले लो गलमा गलम', बाईकवर बसून जेव्हा दुकानदार विकू लागला समोसे... पाहा व्हिडीओ title=

मुंबई: बाजारपेठेत एक फेरफटका मारला तर लक्षात येतं की जो हटके पद्धतीनं वस्तू विकण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडेच सर्व ग्राहक आकर्षित होत असतात. ट्रेनमध्ये येणारा एखादा विक्रेता असो किंवा रस्त्यावरचा फेरिवाला. त्याच्या ओरडण्याच्या हटके स्टाईलमुळेही आपण कुतुहलाने तो काय विकतोय हे पाहायला जात असतो. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग ठप्प झाले. 

असे काही विक्रेते असतात ज्याच्या वस्तू विकण्याच्या स्टाईलमुळे आपल्याला खूप हसू येतं किंवा बऱ्याचदा आपल्याला काय रिअॅक्ट व्हावं हे सूचत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती समोसे आणि कचोरी विकत असल्याचं दिसत आहे. त्याची विकण्याची स्टाईलच इतकी भारी आहे की बस्स.

या व्यक्तीच्या विकण्याच्या अजब स्टाईलमुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. हा व्यक्ती बोबडा असल्याने तो समोसा आणि कचोरीचे उच्चार नीट करू शकत नाही. त्यामुळे तो समोसा घ्या गलमा गलम असं म्हणत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्याची बोलण्याची स्टाईल खूप वेगळी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा होत आहे. 

समोसावाला आपले समोसे विकत असताना कुणीतरी त्याचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. Giedde नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप लोकांनी लाईक केलं आहे.