जन्माष्टमीला एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचे दर

सोन्या चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. सोमवारी सोन्याचे दर घसरले आहेत.

Updated: Aug 30, 2021, 05:53 PM IST
जन्माष्टमीला एवढ्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचे दर title=
मुंबई: गेल्या काही दिवसांत सोन्या चांदीचे दर पुन्हा एकदा उतरताना दिसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव स्वस्त होत असल्याचं पाहून ग्राहकांमध्ये 
खरेदीचा उत्साह आहे. जेव्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण होते तेव्हा ग्राहक खरेदीसाठी सराफ बाजार गाठतात आणि काही ना काही खरेदी करतात. दिवळीपर्यंत पुन्हा 
एकदा सोनं 60 हजारपर्यंत पोहोचेल असं सांगितलं जात आहे. 
 
सोन्या चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. सोमवारी सोन्याचे दर घसरले आहेत. 211 रुपयांनी सोन्याचे दर घसरले असून आज सोन्याला 47 हजार 
327.00 रुपये भाव सराफ मार्केटमध्ये मिळत आहे. तर चांदीच्या दरामध्ये 34 रुपयांची घसरण झाली असून किलोमागे 63 हजार 551 रुपये मोजावे लागणार आहेत.
 
28 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 270 रुपये होता. तर 27 ऑगस्ट रोजी 48 हजार 810 रुपये दर होता. आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून 47 हजार 327.00 रुपये  एवढे ग्राहकांना प्रति तोळ्यामागे पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज सोन्याचे दर जवळपास हजार रुपयांनी स्वस्त झाले असे म्हणायला हरकत नाही. 
 
2021मध्ये सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्यावर्षी 2020 मध्ये सोन्याच्या दराने कमालीचा उच्चांक गाठला होता. जवळपास 56 हजारहून अधिक सोन्याच्या किंमती पोहोचल्या होत्या. आता सोन्याचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 8 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
 
दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 46 हजार 720 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50 हजार 950 आहे.  मुंबईत 22 कॅरेट सोने 46 हजार 670 आणि 24 कॅरेट सोने 47 हजार 670 वर आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोने 47,120 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोने 49 हजार 820 रुपये आहे. 
 
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 45 हजार 090 रुपये आणि 24 कॅरेटची किंमत 49 हजार 190 रुपये आहे. हे दर 10 ग्रॅम सोन्याचे आहेत.
चांदी प्रति किलोची किंमत 63,600 रुपये प्रति किलो आहे. मुंबई आणि कोलकातामध्ये चांदीच्या भावात विशेष बदल झालेला नाही. चेन्नईमध्ये चांदीची किंमत 68,400 रुपये प्रति किलो आहे.