'इतक्या' ब्रा आणि वेस्ट साईजचीच वधू हवी; लग्नासाठी अजब अट

लग्नासाठी अजब अट; कंबर आणि ब्रा साईजचं माप.... इतकंच हवं  

Updated: Nov 24, 2021, 10:11 AM IST
'इतक्या' ब्रा आणि वेस्ट साईजचीच वधू हवी; लग्नासाठी अजब अट title=

मुंबई : मॅट्रिमोनी साइट्सवर लाइफ पार्टनर शोधणाऱ्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  मॅट्रिमोनी साइट्सच्या माध्यमातून लग्नासाठी इच्छुक व्यक्ती आपल्या अपेक्षा मांडत असतो. पण काही लोकांनी याठिकाणी विचित्र मागण्या करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, एका व्यक्तीने आपल्या भावी वधूबद्दल आपली निवड सांगितल्यानंतर इंटरनेटवर खळबळ उडाली. एका वैवाहिक जाहिरातीमध्ये, या तरुणाने, आपल्या नववधूच्या शरीराच्या अवयवांचा उल्लेख करून,  माप देखील लिहिलं आहे. 

screen shot

जाहिरातीनुसार, भारतीय व्यक्तीने लिहिले की, 'मला 5'2-5'6 (की उंची), 32बी-32सी (ब्रा साइज) आणि 12-16  वेस्ट साइजची वधू हवी आहे. या वैवाहिक जाहिरातीच्या स्क्रीनशॉटने खळबळ उडवून दिली आहे. या व्यक्तीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण जाहिरातीत वधूच्या शरीराच्या अवयवांचा पसंतीचा आकार नमूद करण्यात आला आहे.

व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी 
पोस्टचा स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर वेगवेगळ्या युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी Betterhalf.ai या वैवाहिक जाहिरातींशी संबंधित वेबसाइटवर कारवाईची मागणी केली आहे.