हे एक पोस्टाचं तिकीट बनवू शकतं तुम्हांला करोडपती

एका रात्रीत करोडपती होण्यासाठी काय करायला हवे ? असे विचारल्यानंतर सहाजिकच लॉटरी किंवा एखादी किमया तुम्हांला मदत करेल असे उत्तर मिळेल. पण आता एक पोस्टाचं तिकीटदेखील तुमचं नशीब पलटवू शकते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 

Updated: Nov 13, 2017, 12:27 PM IST
हे एक पोस्टाचं तिकीट बनवू शकतं तुम्हांला करोडपती  title=

मुंबई : एका रात्रीत करोडपती होण्यासाठी काय करायला हवे ? असे विचारल्यानंतर सहाजिकच लॉटरी किंवा एखादी किमया तुम्हांला मदत करेल असे उत्तर मिळेल. पण आता एक पोस्टाचं तिकीटदेखील तुमचं नशीब पलटवू शकते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 

कोणतं आहे हे तिकीट ? 
महात्मा गांधींचा फोटो असलेले १० रूपयांचं तिकीट ही किमया करू शकतं. १९४८ साली अगदीच ठराविक स्वरूपात त्याची छपाई करण्यात आली होती. या तिकीटावर सर्व्हिस प्रिंट असं लिहलेलं असणं गरजेचे आहे. अनेकांना अशी दुर्मिळ तिकीटं साठवण्याचा छंद आहे. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  गवर्नर जनरलने या पोस्टाच्या तिकीटाला ओवरप्रिंट केलं होतं. जगभरात अत्यंत कमी प्रमाणात या तिकीटाची छपाई करण्यात आलेली असल्याचे काही रिपोर्टमधून समोर आले आहे. 
काही वर्षांपूर्वी जिनिव्हामध्ये जेव्हा या तिकीटाचा लिलाव करण्यात आला होता तेव्हा त्याची किंमत सुमारे 2 लाख डॉलर म्हणजेच 1 करोड ३० लाख इतकी होती. त्यातही जर कोणाकडे 'कॅन्सल' झालेलं पोस्टाचं तिकीट असेल तर त्याची किंमत करोडोंमध्ये असणार आहे. 

काही महिन्यांपूर्वी या तिकीटाच्या एका सेटला ५ लाख पाऊंड म्हणजेच ४.१४ करोड रूपयांमध्ये विकले गेले होते. केवळ २०० तिकीट छापण्यात आली होती. त्यापैकी १०० वापरासाठी बाहेर दिली होती. काही डाक संग्राहलयात आहेत तर बाजरात केवळ १० तिकिटं उपलब्ध आहेत. त्यामुळे ही फारच दुर्मिक ठरली आहेत.