भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये राहणाऱ्या राकेश कुमार गुप्ता यांनी पाच आणि दहा रुपयांची नाणी एकत्र करुन तब्बल एक लाख रुपये जमा केले. एवढंच नाही तर त्यांनी एक लाख रुपयांचे सुट्टे पैसे देऊन ८३ हजार रुपयांची Activa 125 BSVI खरेदी केली आहे.
राकेश, ६० किलो वजनाची ५-१० रुपयांची नाणी घेऊन होंडाच्या शोरुममध्ये पोहचले होते. मध्यप्रदेशमधील सतनामध्ये राकेश कुमार यांच्या अॅक्टिव्हाची जबरदस्त चर्चा आहे.
राकेश शोरुममध्ये अॅक्टिव्हा १२५ खरेदी करण्यासाठी गेले असता, शोरुम मॅनेजरने राकेश यांना संपूर्ण गाडीची माहिती, दिली. कलर दाखवले. गाडी पसंती केल्यानंतर पैसे देण्यावेळी राकेश यांनी संपूर्ण सुट्टे पैसे दिले. त्यांच्या या पेमेंटनंतर शोरुममधील मॅनेजरसह संपूर्ण स्टाफ थक्क झाला.
शोरुम मॅनेजरने सुट्टे पैसे घेण्यास नकार दिला नाही. स्टाफमधील काही लोकांनी मिळून पिशवीतील सुट्टे पैसे मोजले. तीन तासांनंतर शोरुमच्या स्टाफने ८३ हजार रुपये एकत्र केले.
अशाप्रकारे सुट्टे पैसे देऊन गाडी खरेदी करणारा हा पहिलाच व्यक्ती आल्याचं, शोरुमचे अधिकारी आशिष पुरी यांनी सांगितलं.
राकेश यांचं किराणा सामानाचं दुकान आहे. अनेकदा ग्राहक सुट्टे पैसे घेऊन येतात. गेल्या कित्येक दिवसांपासून हे सुट्टे पैसे जमा केले असल्याचं राकेश यांनी सांगितलं.