सारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीला वाचवण्यात अपयश

मध्यप्रदेशमधल्या सीहोरमध्ये 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला वाचवण्यात अपयश आलं. मंगळवारी दुपारी खेळताखेळता अडीच वर्षांची सृष्टी बोअरवेलमध्ये पडली. तीला वाचवण्यासाठी तीन दिवस मदतकार्य सुरु होतं. 

राजीव कासले | Updated: Jun 8, 2023, 09:00 PM IST
सारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीला वाचवण्यात अपयश title=

MP News :सलग तीन दिवस मदतकार्य राबवलं पण अडीच वर्षांच्या सृष्टीला (Srushti) वाचवण्यात अपयश आलं. मध्यप्रदेशच्या सीहोर (MP Sehore) गावाती मुंगावली इथं अडीच वर्षांची सृष्टी 300 फूट बोअरवेलमध्ये (Borewell) पडली. तिला तीन दिवसांनंतर तिला आज बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सृष्टीला बाहेर काढण्यासाठी रोबोटची (Robots) मदत घेण्यात आली होती. 

मंगळवारी घराबाहेर खेळता-खेळता सृष्टी जवळच्या बोअरवेलमध्ये पडली. मंगळवारी बचावपथकाने (Reque Operation) सृष्टीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण बोअरवेलचं तोंड निमुळतं असल्याने मतदकार्यात अनेक अडथळे येत होते. त्यानंतर बुधवारी रोबोटिक एक्सपर्टची मदत घेण्यात आली. खड्डा लहान असल्याने मुलीला श्वास घेण्यास अडचण निर्माण होत होती. यासाठी तिला पाईपद्वारे ऑक्सिजन दिलं जात होतं. 

पण दुर्देवाने मुलगी आणखी खाली खाली सरकत होती. 20 फुटावरुन ती 100 फुट खाली घसरली. त्यामुळे मदतकार्य आणखी अवघड होऊन बसलं. सृष्टीला वाचवण्यासाठी सेना, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचं दिवसरात्र बचावकार्य सुरु होतं. बचावकार्य सुरु असतानाच गुरुवारी जोराचे वारे वाहू लागले आणि हलका पाऊसही झाला. पण त्यामुळे माती चिकट झाली आणि बचावकार्य आणखी अवघड होऊन बसलं. गुरुवारी संध्याकाळी रोबोटच्या मदतीने सृष्टीला बाहेर काढण्यात आलं. पण दुर्देवाने ती वाचू शकली नाही.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुंगावली हे ठिकाण खडकाळ भागावर आहे. त्यामुळे बचावकार्यला तिथपर्यंत पोहोचण्यास उशीर लागला. घटनास्थळी एसडीआरएफ, एनडीआएफ आणि सेनेच्या जवानांनी धाव घेत रेस्क्यू ऑफरेशन सुरु केल. दिल्लीवर रोबोटिक टीमलाही बोलावण्यात आलं. बोअरवेलच्या समांतर खोल खड्डा करुन रोबोटच्या मदतीने सृष्टीला बाहेर काढण्यात आलं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची टीमही घटनेवर लक्ष ठेवून होती. 

सृष्टीच्या मृत्यूवर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सृष्टी बोअरेवलमध्ये वीस फूटावर अडकली होती. पण बचावकार्य करताना मशीनच्या कंपनांमुळे ती आणखी खाली घसरत गेली, ज्यामुळे बचावकार्य अधिक अवघड होऊन बसलं. भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही घटनास्थळाला भेट दिली. सृष्टीच्या मृत्यूवर त्यांनी दु:ख व्यक्त केलं. तसंच या प्रकरणात ज्यांनी निष्काळजीपणा केला आहे, त्यांच्यावर कारवाईची मागमी प्रज्ञा सिंह यांनी केली आहे.