भारताच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू

 व्यंकय्या नायडू यांना ५६६ मतं मिळाली आहेत. तर गोपालकृष्ण गांधी यांना ४४ मते मिळाली आहेत.  

Updated: Aug 5, 2017, 07:16 PM IST
भारताच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू title=

नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू यांची निवड झालेली आहे. व्यंकय्या नायडू यांना ५६६ मतं मिळाली आहेत. तर गोपालकृष्ण गांधी यांना ४४ मते मिळाली आहेत.  

यूपीएचे उमेदवार डॉ. गोपालकृष्ण गांधी यांचा एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी पराभव केला आहे. व्यंकय्या नायडू यांना पदांचा चांगला अनुभव आहे, अनेक वेळा त्यांनी मंत्रीपद भूषवलं आहे. 

भाजपाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देखील व्यंकय्या नायडू यांनी भूषवलं होतं.