मुंबई : खरेदी करताना आपल्याला कायमच अडचणीचा सामना करावा लागतो. ती अडचण म्हणजे भारतीयांना आपल्या शरीराच्या फिटिंगनुसार कपडे मिळतं. कधी US तर कधी UK च्या साइजमध्ये आपण कपडे शोधत असतो. तर कधी स्मॉल ते एक्स्ट्रा लार्जचा हिशेब समजून घेतो. ऑनलाईन शॉपिंगवेळी तर ही समस्या सर्वाधिक जाणवते. कधी कधी एका ब्रँडचा स्माइल साइज तर दुसऱ्याची मीडियम आणि तिसऱ्या ब्रँडच लार्ज साइजचे कपडे आपल्याला फिट होतात. कधी कधीतर आपल्याला कपडे चांगले फिटिंगलाही बसत नाही पण आपण तडजोड करतो. मात्र आता तस होणार नाही भारतात आता रेडिमेंड कपड्यांचं बाजार भारतीय व्यक्तींच्या साइजनुसार बदलणार आहे.
भारताची सर्वाधिक लोकसंसख्या असलेल्या 135 करोड लोकांना त्यांच्या त्यांच्या साइजचे कपडे पुरवणं शक्य आहे का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा निर्णय कपडा मंत्रालयाने घेतला आहे. भारताच्या डिझाइन इंडस्ट्रीसोबत देशातील 25 हजार लोकांचा सर्व्हे करण्यात आला. यामधून भारतीय लोकांची परफेक्ट साइज शोधण्याचा प्रयत्न केला.
कपडा मंत्रालय आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन ऍण्ड टेक्नॉलॉजी (National Institute of Fashion Technology) यांनी एकत्र येऊन भारतीयांच्या परफेक्ट मापाचा शोध सुरू केला. 2019 मध्ये सुरू केलेल्या या प्रोजेक्टला कोरोनामुळे थांबवण्यात आलं होतं. मात्र आता दिल्लीत याबाबतचा सर्व्हे सुरू आहे.
देशातील 6 वेगवेगळ्या देशांमधून लोकांचं योग्य माप घेऊन हा सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे. दिल्लीसोबतच मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि शिलॉग सारख्या ठिकाणांहून सर्व्हे करण्यात येणार आहे. राज्यानुसार भारतीयांच्या शरीरयष्ठीत फरक असतो त्यामुळे या राज्यांचा सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या सर्व्हेमधून लक्षात आलं आहे की, भारतीयांना आता आपल्या साइजचे कपडे मिळणं सोपं जाणार आहे. तसेच भारतातील रेडिमेड कपड्यांच्या व्यवसायाला देखील याचा फायदा होणार आहे. दरवर्षी 20 ते 30 टक्के कपडे फिटिंगमुळे रिजेक्ट होतात. कारण ते कोणालाच परफेक्ट बसत नाही.
सर्व्हेमध्ये कुणी टेलर माप घेण्यासाठी नसते. तसेच पारंपरिक पद्धतीने देखील साइज घेतली जात नाही. याकरता 3 थ्री डी स्कॅनर लावण्यात आले आहेत. 120 अंशात माप घेतलं जातं. सध्या दिल्लीत हे स्कॅनर NIFT, Select City Walk Mall आणि गाझियाबादमधील वैशाली येथील शॉपिंग मॉलमध्ये लावण्यात आले आहेत. या सर्व्हेत कुणीही सहभागी होऊ शकतं. त्याला एक फॉर्म भरावा लागणार आहे. आणि तो या सर्व्हेचा भाग होऊ शकतो.
दिल्लीत सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर स्कॅनर इतर शहरांतही घेण्यात येणार आहे. अर्धा डाटा मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी डाटाचं आकलन होणार आहे. त्यानंतर इतर सर्व्हे केला जाणार आहे. उल्लेखनीय आहे की हा सर्व्हे दोन वर्षांत भारतीयांना देणार आपला साइज चार्ट. रेडिमेड कपडे बनवणारे निर्माते त्यानंतर या साइजच्या आधारावर कपडे बनवणार आहेत.