Lucknow Girl : प्रियदर्शिनीची कॅब ड्रायव्हरला धमकी, पॅचअप कर नाहीतर...

प्रियदर्शिनीने पोलिसांवर देखील केले गंभीर आरोप 

Updated: Aug 13, 2021, 06:59 AM IST
Lucknow Girl : प्रियदर्शिनीची कॅब ड्रायव्हरला धमकी, पॅचअप कर नाहीतर... title=

मुंबई : कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्यानंतर चर्चेत आलेली Lucknow Girl प्रियदर्शिनी नारायणने 'त्या' कॅब चालकाला धमकी दिली आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पोलिसांबाबतही भाष्य केलं आहे. पोलिसांनी जर आपलं काम व्यवस्थित केलं असतं तर आज त्या चालकाला थप्पड मारण्याची गरज नसती. 

प्रियदर्शिनी नारायणने पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आपलं काम केलेलं नाही. यामुळे तिलाच कायदा हातात घ्यावा लागला. तसेच आता प्रियदर्शिनी या प्रकरणात पॅचअपबद्दल बोलत आहे. एका टीव्ही चॅनलच्या रिपोर्टरशी बोलताना प्रियदर्शिनीने धमकी देताना सांगितलं की, सादत अली सिद्दीकी (कॅब चालक) ने पॅचअप करावं नाहीतर मी त्याची पोलखोल करेन. प्रियदर्शिनी म्हणते की, मी पोलखोलमध्ये मी घरातून निघाल्यापासून पोहोचेपर्यंत सगळे सीसीटीव्ही फुटेज काढेन. यामध्ये हॉटेल, मेट्रो, पोलीस स्टेशन येथील सगळे सीसीटीव्ही फुटेज टाकेन. 

एका टीव्ही चॅनलच्या रिपोर्टरशी बोलताना प्रियदर्शिनीने धमकी देताना सांगितलं की, सादत अली सिद्दीकी (कॅब चालक) ने पॅचअप करावं नाहीतर मी त्याची पोलखोल करेन. प्रियदर्शिनी म्हणते की, मी पोलखोलमध्ये मी घरातून निघाल्यापासून पोहोचेपर्यंत सगळे सीसीटीव्ही फुटेज काढेन. यामध्ये हॉटेल, मेट्रो, पोलीस स्टेशन येथील सगळे सीसीटीव्ही फुटेज टाकेन. 

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

लखनऊमध्ये कृष्णानगरच्या परिसरात भर रस्त्यात प्रियदर्शिनी नारायणने उबेरच्या कॅब ड्रायव्हरला पकडून त्याला मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्याचा फोन देखील फोडला. जवळपास अर्धा तास प्रियदर्शिनी भररस्त्यात हा ड्रामा करत होती. तिने कॅब चालकाला तब्बल 22 वेळा कानाखाली मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. 

#ArrestLucknowGirl या नावाने ट्विटरवर हॅशटॅग देखील ट्रेंड झाली. व्हिडीओतून धक्कादायक वास्तव समोर आलं. पोलिसांनी या तरूणी विरोधात मारहाण आणि लूट करण्याचा गुन्हा नोंदवला.