Loksabha: अक्षय कुमारला चांदणी चौकमधून संधी? सेहवाग, कंगणालाही लागणार BJP च्या तिकीटाची लॉटरी?

Lok Sabha Election 2024 BJP First Candidate List: भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांमध्येच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेच्याआधी भाजपा उमेदवार जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 29, 2024, 12:56 PM IST
Loksabha: अक्षय कुमारला चांदणी चौकमधून संधी? सेहवाग, कंगणालाही लागणार BJP च्या तिकीटाची लॉटरी? title=
आज दिल्लीत बैठक होण्याची शक्यता

Lok Sabha Election 2024 BJP First Candidate List: लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर केली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींचं नाव वारणसी मतदारसंघातून असेल असं निश्चित मानलं जात आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (29 फेब्रुवारी 2024 रोजी) सायंकाळी होऊ शकते असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या यादीत काही आश्चर्यचकित करणारी नावंही असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुषमा स्वराज यांच्या लेकीला तिकीट?

दिल्लीमधील 7 जागांसाठी संभाव्य नावांमध्ये भाजपाचे दिल्ली प्रमुख वीरेंद्र सचदेवा आणि बासुरी स्वराज यांचं नावही चर्चेत आहे. बासुरी स्वराज या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. बुधवारी दिल्लीतील 7 जागांसंदर्भातील मतं आणि सर्वेची आकडेवारी भाजपाने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील काही विद्यमान खासादरांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी दाट शक्यता आहे. काही दिवसांमध्ये नवीन उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते असंही म्हटलं जात आहे.

28 जणांच्या नावाची

दिल्ली भाजपाने वरिष्ठांना काही उमेदवारांची नावं पाठवली आहेत. आठवड्याभरात पहिली यादी जाहीर होईल अशी शक्यता आहे. भाजपाचे सर्व राज्यप्रमुख भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. नड्डांच्या नेतृत्वाखालीच सर्व राज्य प्रमुखांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत 28 जणांच्या नावाची चर्चा आहे. दिल्लीतील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रमुखांनी संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या बैठकीचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे या बैठकीत नावं निश्चित होतील असं मानलं जात आहे. 

नक्की वाचा >> LokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी 'या' नावाला दिली भरभरुन मतं

अक्षय कुमार निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्लीमधील चांदणी चौक मतदारसंघातून अभिनेता अक्षय कुमारला तिकीट दिलं जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघामध्ये अक्षय कुमारबरोबरच माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, विष्णू मित्तल आणि विजेंद्र गुप्ता यांच्या नावांचीही संभाव्य उमेदवारांमध्ये समावेश आहे. या निवडणुकीमध्ये चांदणी चौक मतदारसंघातून जे. पी. अग्रवाल किंवा संदीप दीक्षित निवडणूक लढू शकतात. अक्षय कुमारला पूर्व दिल्ली मतदारसंघातूनही निवडणुकीत उतरवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> Lok Sabha Opinion Poll : मराठा आरक्षणाचा राज्यातील लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार... पाहा जनतेचा कौल

सेहवाग आणि कंगणाचं नावही चर्चेत

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने यापूर्वीच आपण राजकारणात येणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरी लोकसभा निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवारांमध्ये त्याच्या नावाची चर्चा आहे. सेहवागला गृहराज्यातून तिकीट दिलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री कंगणा राणौतलाही उत्तरांखंडमधून तिकीट मिळू शकतं अशी चर्चा आहे. 13 मार्चनंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.