भाजपच्या 'या' उमेदवाराच्या लंडनच्या बँक खात्यात कोटींची संपत्ती, भारतात मर्जिडीज कार अन् मुंबईत फ्लॅट; कोण आहे हा नेता?

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या एका उमेदवाराची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 12, 2024, 03:06 PM IST
भाजपच्या 'या' उमेदवाराच्या लंडनच्या बँक खात्यात कोटींची संपत्ती, भारतात मर्जिडीज कार अन् मुंबईत फ्लॅट; कोण आहे हा नेता? title=
loksabha election 2024 bjp candidate shashank mani tripathi crores of money in london bank accounts

Loksabha Election 2024: उत्तर प्रदेशच्या देवरिया लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने शशांक मणी त्रिपाठी यांना तिकिट दिलं आहे. सध्या शशांक मणी त्रिपाठी यांची चर्चा आहे. आयआयटी दिल्लीनंतर स्विट्जरलँडमध्ये बिझनेस स्कुलमधून एमबीएपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यानंतर भारतात येऊन त्यांनी कौटुंबिक उद्योजक सांभाळला. शंशाक त्रिपाठी यांनी अलीकडेच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रानुसार, लंडनच्या बँक अकाउंटमध्ये कोटींची संपत्ती आहे. त्याचबरोबर एक मर्सिडिज कार आणि मुंबईतही फ्लॅट आहेत. 

देवरिया लोकसभा मतदारसंघातून लढणाऱ्या शशांक मणि त्रिपाठी यांनी त्यांच्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली आहे. शपथपत्रात नमूद केल्यानुसार, ते 16 कोटी संपत्तीचे मालक आहेत. ज्यात 10 कोटी 48 लाख रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याकडे एक मर्सिडिज कारबरोबरच इनोव्हा आणि निसान मायक्रा कारदेखील आहे. व त्यांच्यावर कोणताही गुन्हादेखील दाखल नाहीये. 

लंडनच्या कॅनिग्स्टन येथील नेटवेस्ट बँकेत शशांक यांचे खाते आहे. शशांक मणि यांच्या बँक खात्यात 6 कोटी 48 लाख रुपये आहेत. तर, पत्नी गौरी त्रिपाठी यांच्या खात्यात 32 लाख 43 हजार रुपये आणि मोठी मुलीच्या खात्यात 32 लाख 42 हजार आहेत. तर, लहान मुलीच्या नावे लंडनमध्ये 3 वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण 7 लाख 58 हजार रुपयांची रक्कम जमा आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे 55 ग्रॅम सोनंदेखील आहे. देवरिया जिल्ह्यातील बरपार गावचे मूळ रहिवाशी असलेल्या शशांक त्रिपाठी यांच्या शपथपत्रानुसार, मुंबई शहरातही शशांक यांचा 1950 स्केअरफुट फ्लॅट आहे. त्याव्यतिरिक्त देवरियामध्ये स्वतः विकत घेतलेली साडे चार एकर जमिन आहे. त्याची बाजारात किंमत जवळपास 2.5 कोटी इतकी आहे. 

कोण आहेत शशांक त्रिपाठी?

शशांक यांचे अजोबा पंडित सूरत नारायण मणि त्रिपाठी उत्तर प्रदेश कॅडरटे आयएएस होते. ते अनेक जिल्ह्यांचे डीएम, काशी विठ्यापीठ वाराणसीचे व्हॉइस चान्सलर आणि गोरखपुर विश्वविद्यालयचे संस्थापक होते. ते विधान परिषदचे सदस्यदेखील होते. होते. शशांकचे वडील श्रीप्रकार मणि नारायण त्रिपाठी भारतीय सैन्यात लेफ्टिनंट जनरल होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भाजप जॉइन केली. 1996मध्ये त्यांनी देवरिया लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटांवर खासदार झाले. तर, शशांक त्रिपाठी यांचे काका श्रीनिवास त्रिपाठी देवरिया जिल्ह्यातील गौरी बाजार मतदारसंघातून आमदार होते. तर, दुसरे काका श्रीविलास मणि त्रिपाठी आयपीएस अधिकारी होते. ते उत्तर प्रदेश पोलिस दलाचे डीजीपीदेखील होते.